Weather Update Mumbai monsoon Update 2023 when wil monsoon be active in maharashtra check details  
महाराष्ट्र बातम्या

Weather Update : राज्यात मान्सून कधी सक्रीय होणार? मुंबईत 'या' दिवशी बरसणार पाऊस; हवामान खात्याने दिली माहिती

रोहित कणसे

केरळनंतर महाराष्ट्रात मान्सून दाखल होऊन बराच काळ लोटला आहे, मात्र अद्यापही राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाची प्रतिक्षा आहे. यादमम्यान उकाड्याने नागरिक हैराण झाल्याचं पाहायला मिळत आहे. पेरणीची वेळ उलटून गेल्याने पावसासाठी शेतकरी आभाळाकडे डोळे लाऊन बसले आहेत. नेमकं राज्यात मान्सून पुन्हा कधी सक्रिय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच हवामान विभागाने महत्वाची अपडेट दिली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात मान्सून २६ जूननंतर सक्रीय होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पावसासाठी सामान्या नागरिक ते शेतकरी यांनी आणखी काही दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे यावर्षी मान्सूनच्या प्रवासावर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान आता राज्यात मान्सून २६ जून नंतर पुन्हा सक्रिय होईल आणि या आठवड्याच्या शेवटी मुंबईत मान्सूनचा जोर वाढेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तसेच २३ आणि २४ जूननंतर अरबी समुद्रावरुन येणाऱ्या वाऱ्यांना गती मिळण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

महाराष्ट्रासोबतच पुढील पाच दिवस दक्षिण भारतातील राज्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. तामिळनाडूत मंगळवारी आणि किनारी आंध्र प्रदेशात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता आहे.

मंगळवारी सकाळी चेन्नई, तिरुवल्लूर, कांचीपुरम आणि चेंगलपट्टू जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मंगळवारी सकाळी कांचीपुरम आणि चेंगलपट्टू जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांच्या आसपासच्या भागातही पाऊस पडू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: अर्थखात्यासाठी राष्ट्रवादीची जोरदार लॉबिंग; चार महिन्यांनंतरही निर्णय रखडला, खाते परत मिळवण्यासाठी पक्ष आक्रमक

Indian Railways Hydrogen Train: देशातील पहिला प्रयोग हरियानात! डिझेलविना, प्रदूषणविरहित धावणार हायड्रोजन रेल्वे; रेल्वे मंत्रालयाचा हिरवा कंदील

मोठी बातमी! ग्रामपंचायतींचा नोव्हेंबरअखेर वाजणार बिगुल? सरपंच आरक्षण जाहीर, आता सदस्यांची आरक्षण सोडत १२ जूनला; मतदार यादी ‘या’ महिन्यात होणार अंतिम

येत्या जून महिन्यात बनतोय अत्यंत खतरनाक खप्पर योग ! रातोरात बदलणार नशीब; कुणाला शुभ तर कुणाला अशुभ घ्या जाणून

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SCROLL FOR NEXT