Maharashtra Rain Alert sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यात गडगडाटासह पाऊस बरसणार, या जिल्ह्यांना अलर्ट जारी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे. विदर्भात उष्णतेची लाट (Vidarbha Heat Wave) आहे. पण, उन्हाच्या झळा कमी होऊन राज्यात परत पावसाचं आगमन होणार आहे. पुढील चार ते पाच दिवसांत काही ठिकाणी गडगडाटासह जोरदार वारे आणि पावसाची (Maharashtra Rain Alert) शक्यता आहे. याबाबत हवामान विभागानं (IMD) अंदाज वर्तवला आहे.

मार्च महिना सुरू होताच तापमानात वाढ झाली. पूर्ण मार्च महिन्यात उन्हाचा तडाखा जाणवला. राजस्थानसह काही राज्यातील लाटसृश्य वातावरणामुळे विदर्भात देखील उष्णतेची लाट आली. गेल्या २९ एप्रिलपासून २ एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट काय होती. अकोला, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, बुलडाणा या जिल्ह्यांतील नागरिकांना उन्हाच्या सर्वाधिक झळा बसल्या. तापमान तब्बल ४२ अंशाच्या वर पोहोचले होते. पण, आता चंद्रपूरसह गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. आज सायंकाळपर्यंत दोन्ही जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह पावासाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

या जिल्ह्यात पडणार पाऊस -

येत्या ५ एप्रिलला कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापुरात दमदार पाऊस पडणार आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच ६ एप्रिलला देखील या चारही जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला असून सोसाट्याच्या वाऱ्यासह आणि गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. कोकणातील नागरिकांना देखील उकड्यापासून दिलासा मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्याला सलग चौथ्या दिवशी पावसानं झोडपलं, घरांमध्ये शिरलं पाणी; काही ठिकाणी गारपीट

Latest Marathi News Live Update : बाणेर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूकीस अडथळा

Talwar Baba: भयंकर! तंत्र-मंत्र आणि भीतीचा खेळ... महाराष्ट्रातील ‘तलवार बाबा’चा काळा चेहरा उघड; 'असं' करायचा शोषण

He Kay Navin Review: 'हे काय नवीन' मध्ये खरंच काही नवीन आहे का? कशी आहे प्रिया उमेशची नवी वेब सीरिज?

Samruddhi Expressway Accidents : काय आहे 'हायवे हिप्नोसिस'? समृद्धीवर का होतायत अपघात? पूल ठरतात धोकादायक!

SCROLL FOR NEXT