rain update esakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यात पुढचे 4 दिवस मुसळधार; मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

सकाळ डिजिटल टीम

राज्यात पुढच्या आठवड्याभरात पुन्हा पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

पुणे - राज्यात पुढच्या आठवड्याभरात पुन्हा पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढचे 4-5 दिवस राज्यात वीजांच्या गडगडाटासहीत काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. येत्या 5 दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. सोमवारी काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला.

राज्यातही थंडीची चाहूल कमी होत असून मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी पुढील चार दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणात बऱ्याच तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र, विदर्भातील बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यातील काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली.

सोमवारी राज्यात सर्वाधिक कमाल तापमान रत्नागिरीत ३५.७ अंश सेल्सिअस तर नीचांकी तापमान महाबळेश्वर येथे १८.२ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. राज्यात ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. जवळपास सर्वच विभागात थंडी कमी झाली आहे.

सध्या अरबी समुद्रात तयार होत असलेले कमी दाबाचे क्षेत्र त्याचबरोबर राज्यात प्रवेश करणारे बाष्पयुक्त वारे यामुळे राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार होत आहे. त्यामुळे १९ नोव्हेंबरपर्यंत दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे.

पुण्यात सोमवारी अंशतः ढगाळ वातावरण होते. त्यामुळे सरासरीच्या तुलनेत किमान तापमानात लक्षणीय वाढ होत किमान तापमान २०.९ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. त्यामुळे सोमवारी दिवसभर उकाडा जाणवत होता. गेल्या तीन दिवसांपासून शहरात थंडी कमी होत असून उकाड्यात वाढ होत आहे. दरम्यान पुढील काही दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याने हे चित्र असेच कायम राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, उड्डाणावेळी...; गुजरात दौऱ्यात काय घडलं?

Nashik Land Scam: 'टंकलेखनातील चूक' सांगत ९८ हजार चौ.मी. जमीन गायब? पीटीसीसमोरील ६२ एकर जमीन प्रकरणात जिल्हा प्रशासनाचा खंडपीठात अहवाल

Latest Marathi News Update : एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांच्यातील विसंवाद काल पासून दूर होण्यास सुरुवात

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात गणेशोत्सवातील देखाव्यातून विरोध; राजू शेट्टी, सतेज पाटील, जयंत पाटलांना भावनिक साद

Devendra Fadnavis: पिके करपली, दुष्काळाचे संकट गडद; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले एनडीआरएफची वाट पाहणार नाही, आधीच शेतकऱ्यांना मदत देणार

SCROLL FOR NEXT