Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update: राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसाच्या उघडिपीमुळे उन्हाचा ताप वाढला; मुंबई-पुण्यात पावसाची काय स्थिती

परतीच्या प्रवासादरम्यान राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

अंकिता खाणे (Ankita Khane)

मॉन्सूनच्या परतीसाठी पोषक स्थिती असून, राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसाने उघडीप दिली आहे. शहर आणि परिसरातही गणेशोत्सवानंतर पावसाचा जोर ओसरल्याचे दिसून येत आहे.

काल (मंगळवारी)उन्हाचा ताप वाढला. पुढील दोन दिवस पुणे व परिसरात अंशतः ढगाळ वातावरणासह अधूनमधून रिमझिम पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पावसाने उघडीप देताच उन्हाचा ताप जाणवू लागला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. सरासरीपेक्षा कमी असलेल्या कमाल तापमानात आता पुन्हा वाढ झाली आहे.

दरम्यान ऑक्टोबर महिना सुरू होताच राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. आता मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होत आहे. परतीच्या प्रवासादरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

यंदा मान्सून 8 ते 10 ऑक्‍टोबरच्या सुमारास मुंबई-पुण्यातून माघार घेणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात मान्सून संपला असून आता परतीचा पाऊस असणार अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. पुढील 2-3 दिवसात राज्यात परतीचा पाऊस सुरू होणार आहे.

तर राज्याच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस हजेरी लावेल, अशी माहिती के एस होसाळीकर यांनी दिली आहे. आगामी 2-3 दिवसांमध्ये राज्याच्या दक्षिण भागात चांगला पाऊस होण्याची शक्यता असून काही दिवस आकाश ढगाळ राहील, असा अंदाज आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugarcane Crushing Season : १५ ऑक्टोबरपासूनचा गाळप हंगामाचा निर्णय रद्द करावा; विविध संघटनांची साखर आयुक्तांकडे मागणी

Kokan Railway : पाच वर्षांत कोकण रेल्वेवर रोज १०० हून अधिक गाड्या; दुपदरीकरणाला वेग, २२ सप्टेंबरला कोकण रेल्वे होणार कर्जमुक्त

Mumbai High Court : घटस्फोटाच्या निकालाला स्थगिती असताना पत्नीला घराबाहेर काढता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

सिनेसृष्टीला धक्का! 'वेलकम' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन; 15 दिवसांपासून होते इस्पितळात

Nagpur News : आई-बाबा मला माफ करा; तरुण अधिवक्‍त्याने गळफास घेऊन संपविले जीवन

SCROLL FOR NEXT