Maharashtra Weather Updates  sakal
महाराष्ट्र बातम्या

Rain Update : पुणे, मुंबईसह राज्यातील काही भागात पावसाची हजेरी; 2 जिल्ह्यांत हवामान विभागाकडून अलर्ट

राज्यातील काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यासह देशभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुणे, मुंबईसह राज्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. तर राज्यातील काही भागात अद्यापही पावसाने दडी मारली आहे. पावसाळा सुरु होऊन एक महिना उलटला तरी पाऊस नसल्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, पुणे मुंबईसह उपनगर, ठाणे, तसेच कोकणातील अनेक जिल्ह्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाकडून वर्तवलेल्या अंदाजानुसार आज कोकणात यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पश्चिम पुणे जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे. परिसरातील नारिकांना खबरदारीचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.(Latest Marathi News)

पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई या ठिकाणी रिपरिप पाऊस सुरू आहे, तर उपनगरांमध्ये धो-धो पाऊस पडत आहे. त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. तर दुसरीकडे सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. 3, 4 आणि 5 जुलै रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडुन देण्यात आला आहे.(Latest Marathi News)

विदर्भ आणि मराठवाड्यात 5 जुलै रोजी मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. 3, 4 आणि 5 जुलै रोजी मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरात मात्र यलो अलर्ट देण्यात आला आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT