October Heat Temperature esakal
महाराष्ट्र बातम्या

October Heat : राज्यात ऑक्टोबर हिटचे चटके! ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात वाढ

पुढील दहा दिवस राज्यातील नागरिकांना ऑक्टोबर हिटच्या झळा सहन कराव्या लागणार आहेत.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यामध्ये ऑक्टोबर हिटचे चटके जाणवायला सुरुवात झाली आहे. पुढील दहा राज्यात उन्हाच्या झळा जाणवण्याची शक्यता आहे. आगामी 10 दिवसांमध्ये तापमानात 1 ते 2 अंश सेल्सिअसची वाढ होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या विदर्भातील तापमान सरासरी 35 अंशांवर आहे. तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रातही तापमानाचा पारा 34 अंशांवर आहे.

पुढील दहा दिवस राज्यात ऑक्टोबर हिटच्या झळा जाणवतील, त्यानंतर तापमानामध्ये घट होऊन थंडीला सुरूवात होईल. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ऑक्टोबरमधील तापमानात सरासरी 1.5 अंश सेल्सिअसने वाढ झालेली आहे.

दरम्यान पुणे शहर आणि परिसरात उन्हाचे चटके अधिक जाणवत असून, दुपारनंतर अंशतः ढगाळ वातावरणामुळे उकाड्यातही वाढ होत आहे. पुढील चार ते पाच दिवस हवामानाची स्थिती अशीच कायम राहणार असल्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे पुणेकरांना उकाडा आणि उन्हाचा ताप असाच जाणवणार आहे.

गेल्या आठवडाभरात शहरातील कमाल तापमान हे सरासरीपेक्षा काहीसे वाढले असून, गुरुवारी (ता. १२) शहरात ३३.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तापमानात साधारणपणे सरासरीपेक्षा २ ते ३ अंशांची वाढ कायम आहे. त्यामुळे उन्हाच्या झळा तीव्र होत आहेत.

दरम्यान, कमाल तापमानात झालेली वाढ अशीच कायम राहणार असून पुणे व परिसरात अधूनमधून अंशतः ढगाळ वातावरणाचे सावटदेखील पाहायला मिळणार आहे. राज्यात विदर्भ आणि कोकणचा काही भाग वगळता उर्वरित राज्यातून मॉन्सून बाहेर पडला असून, उष्णता आणि कोरड्या हवामानाची स्थिती आहे.

यामुळे राज्यातील बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानात वाढ होत असून, 'ऑक्टोबर हिट'चा प्रभाव चांगलाच जाणवत आहे. गुरुवारी (ता. १२) राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद अकोला येथे ३७.५ अंश सेल्सिअस इतकी झाली. विदर्भात उन्हाचा चटका वाढत असून, बहुतांश ठिकाणी पारा ३५ अंशांच्या पुढे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed News: एकाच महिन्यात महिलेचे तीनदा लग्न; बळजबरीमुळे कंटाळून जीवन संपवण्याचा प्रयत्न, पुण्यातून चालतंय लग्नाचं रॅकेट

Latest Marathi News Live Update : उद्या किल्ले रायगडच्या पायथ्याशी मनसेचा 20 वा वर्धापन दिन!

LPG Cylinder Booking Rules : सरकारने घरगुती LPG बुकिंगचे नियम बदलले, आता २१ दिवसांपूर्वी बुक होणार नाही दुसरा सिलिंडर, कारण काय ?

अमृता खानविलकरने चाहत्यांना दिली गुडन्यूज! सुरु केला नवीन प्रवास, चाहत्यांना दिल 'खास' सप्राईज

Kolhapur College Crime: इंजिनियरींगच्या ५ विद्यार्थिनींना प्राध्यापकाने केबीनमध्ये बोलवलं अन् घडलं भयानक; कोल्हापूरमध्ये प्रकार

SCROLL FOR NEXT