Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update: ऐन हिवाळ्यात दिल्ली-एनसीआरसह पंजाब-हरियाणामध्ये पावसाची शक्यता; राज्यात कशी परिस्थिती?

उत्तर भारतात थंडी वाढली उत्तर भारतात थंडीची तीव्र लाट आली आहे. उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे आल्याने राज्याच्या तापमानाचा पारा घसरला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

देशातील बहुतांश राज्यांमध्ये हवामानात मोठे बदल दिसून येत आहे, आगामी काळात दिल्ली-एनसीआरमध्येही भरपूर पाऊस आणि थंडी पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज 22 डिसेंबर रोजी आकाश ढगाळ राहील. याशिवाय आज (शुक्रवारी) रात्री पावसाची शक्यता आहे.

उत्तर भारतात थंडी वाढली उत्तर भारतात थंडीची तीव्र लाट आली आहे. उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे आल्याने राज्याच्या तापमानाचा पारा घसरला आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह राज्यात गारठा कायम असला, तरी किमान तापमानात मात्र चढ-उतार होत आहेत. राज्यात सर्वाधिक किमान तापमान गोंदिया येथे नऊ अंश सेल्सिअस नोंदले गेले.

पंजाबमधील लुधियाना येथे गुरुवारी (ता. २१) नीचांकी २.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड आणि अंतर्गत ओडिशामध्ये अनेक भागांत किमान तापमान ४ ते ८ अंशांच्या दरम्यान आहे.

पुण्यात किमान तापमानात चढ-उतार

शहरात थंडी एकसलग नसून कधी कमाल तापमान सरासरीपर्यंत खाली उतरत आहे तर, कधी सरासरीपेक्षा तीन ते चार अंश सेल्सिअसने वाढत आहे. पुढील तीन ते चार दिवसांमध्ये किमान तापमान १३ ते १४ अंश सेल्सिअसपर्यंत राहील, असा अंदाज हवामान खात्याने शुक्रवारी शहरात शनिवारी (ता. १६) किमान तापमानाचा पारा १२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरला होता. त्यानंतर मंगळवारपर्यंत (ता. १९) १५.२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेला किमान तापमानाचा पारा बुधवारपर्यंत (ता. २०) पुन्हा १२ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला.

आता तोच पारा गुरुवारी (ता. २१) सकाळी साडेआठ वाजेपर्यंत १४.९ अंश सेल्सिअस वाढला आहे. पुढील चार दिवसांमध्ये शहरात आकाश निरभ्र राहण्याची शक्यता असून, किमान तापमानाचा पारा शिवाजीनगर परिसरात १३ ते १४ अंश सेल्सिअस नॉदला जाईल. तर, लोहगावमध्ये तो १६ ते १७ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल, असा अंदाज वर्तविण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dagdusheth Ganpati: भक्तांच्या श्रद्धेला मानाचा मुकुट; दगडूशेठ गणपती संस्थानाला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा!

PBKS vs RCB: बंगळुरूने मिळवलं IPL 2026 प्लेऑफचं तिकीट; पंजाबचा सलग ६ व्या पराभवामुळे CSK, RR चा झाला फायदा

Dhule-Solapur Highway: रजापूर उड्डाण पुलाखाली सिमेंट मिक्सर अडकला; दोन तास वाहतूक ठप्प

Severe Water Crisis: आडूळ परिसरात भीषण पाणीटंचाई; मोसंबी, डाळिंब, आंबा बागा सुकल्या, शेतकऱ्यांवर फळबागा तोडण्याची वेळ

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

SCROLL FOR NEXT