Weather update  sakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update: पुढील 24 तासात 'या' राज्यात मुसळधार पावसासह गारपिटीची शक्यता! महाराष्ट्रात काय स्थिती?

Weather Update: देशासह राज्यातील हवामानात बदल होताना दिसत आहे. काही राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. तर, काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

देशासह राज्यातील हवामानात बदल होताना दिसत आहे. काही राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. तर, काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या दमट वाऱ्यांमुळे देशाच्या हवामानात बदल होत असून ढगाळ वातावरण दिसून येत आहे. यामुळे देशाच्या काही भागात थंडीही कमी झाली आहे. येत्या काही दिवसात वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होण्याची शक्यता असून त्यामुळे काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि राजस्थान या राज्यांमध्ये पुढील 2 दिवसात कडाक्याच्या थंडी राहणार आहे. तर 8 ते 10 जानेवारी दरम्यान वायव्य आणि मध्य भारतात गडगडाटासह वादळी वाऱ्यांसह गारपिटी आणि सक्रिय पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसरा, राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशात गारपीट होण्याची शक्यता आहे.

पुढील 5 दिवस दक्षिण भारतात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलीय आहे. केरळमध्ये 2 दिवस मुसळधार आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारतात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तामिळनाडूमधील किनारी भागातील मच्छिमारांना विशेष इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात काय परिस्थिती?

गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. आजही महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज आहे. यासोबतच गुजरात, उत्तर-पश्चिम भारत, मध्य भारतातही पावसाची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT