Maharashtra Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update: राज्यात यलो अलर्ट; तर बंगालमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Weather Update: राज्याच्या काही काही भागात मोठ्या प्रमाणावर उष्णता जाणवू लागली आहे. तर चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालच्या जलपाईगुडीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

देशासह राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. राज्याच्या काही काही भागात मोठ्या प्रमाणावर उष्णता जाणवू लागली आहे. तर चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालच्या जलपाईगुडीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर आसाममधील गुवाहाटी विमानतळावर रविवारी (31 मार्च 2024) वादळ आणि मुसळधार पावसामुळे गुवाहाटीच्या गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाहेरील छताचा काही भाग कोसळला.

तर महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये गेल्या 2-3 दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. आजही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातही हवामान विभागाने आज पावसाचा इशारा दिला आहे.

महाराष्ट्रातील या भागात पावसाची शक्यता

सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, अहमदनगर, बीड, छ. संभाजीनगर, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, या जिल्ह्यांमध्ये आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील या भागात उष्णतेची लाटेचा शक्यता

राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली असली तरी काही भागात कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, चंद्रपूर, अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यात पुढचे 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

पावसाचा बंगालला मोठा फटका

बंगालमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाने अनेक झाडे उन्मळून पडली, अनेक घरांचे नुकसान झाले आणि आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. या चक्रीवादळामुळे 100 हून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही वादळानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: काँग्रेसने विधेयकाची भ्रूणहत्या केली, पापाची शिक्षा नक्की मिळेल; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्राला संबोधन

SRH vs CSK Live: संजू सॅमसनचा एक निर्णय अन् गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्याने हैदराबादचे नशीब बदलून टाकले; चेन्नईने कमबॅक केले

SRH vs CSK Live: अभिषेक शर्माला 'चिटींग' करायची होती, पण संजू सॅमसनने चोरी पकडली; IPL 2026 मध्ये आणखी एक ड्रामा, Video

IPL 2026 News: विराट कोहलीच्या stunning catch वर व्हायरल होतेय अनुष्का शर्माची रिअ‍ॅक्शन; Video

Khambatki Ghat Traffic Jam : खंबाटकी घाटात ST बस ठप्प; विकेंडला पुणे-सातारा महामार्गावर भीषण ट्रॅफिक कोंडी!

SCROLL FOR NEXT