Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update: आज राज्यात मुसळधार, पुण्यासह 'या' 4 जिल्ह्यांत रेड अलर्ट

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजाची चिंता वाढली होती. पावसाअभावी शेतीची कामं खोळंबली होती. अखेर राज्याच्या अनेक भागामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Latest Marathi News)

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.तर रायगड, पालघर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. रायगड, पालघर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.मुंबईसह ठाण्यातही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.  (Marathi Tajya Batmya)

रत्नागिरी, कोल्हापूर, ठाणे, नाशिक, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.(Latest Marathi News)

पुण्यासह पालघर, सातारा आणि रायगडमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. या चारही जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर आज मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून मुसळधार पावसाचा अंदाज आहे. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT