weather update  esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update : राज्याच्या काही भागात आज मुसळधार पाऊस, तर काही ठिकाणी पावसाचा जोर ओसरला

राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस, आज विदर्भात यलो अलर्ट

अंकिता खाणे (Ankita Khane)

Monsoon News : राज्यातील काही भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मात्र, राज्यातील अनेक भागामध्ये अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजाचा चिंता आणखी वाढली आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यात पेरण्या शेतीकामे खोळंबली आहेत.(Latest Marathi News)

राज्यात पुढील 2-3 दिवस हवामान संमिश्र राहील असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

आज विदर्भातील जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, पुण्यासह राज्यातील इतर बहुतेक जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता नाही. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर या आठवड्यामध्ये मुंबई, उपनगर परिसरात पावसाचा जोर कमी असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.(Latest Marathi News)

तर राज्यात 13 जुलैपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मात्र विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात पुढील दोन दिवसांसाठी यलो अलर्ट देखील देण्यात आला आहे. तर राज्यात मुंबईसह उपनगर, ठाणे जिल्ह्यासह कोकणात चांगला पाऊस पडत आहे. तसेच अन्य काही जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT