students  Esakal
महाराष्ट्र बातम्या

दहावी-बारावीनंतर काय? विद्यार्थ्यांनो चिंता करू नका, तुमच्या मदतीसाठी असणार ‘करिअर मार्गदर्शन केंद्र’

मुलांना भविष्याची अचूक वाट दाखविण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून सोलापुरात स्वतंत्र समुपदेशन केंद्र सुरु होत आहे. त्याठीकाणी कोणत्याही शाखेचा विद्यार्थी येवून मार्गदर्शन घेवू शकणार आहेत. साधारणत: मार्च-एप्रिल दरम्यान हे केंद्र सुरु होणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : दहावी किंवा बारावी उत्तीर्ण झालो, आता पुढे काय करायचे, कोणत्या क्षेत्रातून नोकरीची संधी मिळेल, असे प्रश्न त्या मुलांच्या मनात काहूर निर्माण करतात. त्या मुलांना भविष्याची अचूक वाट दाखविण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून सोलापुरात स्वतंत्र समुपदेशन केंद्र सुरु होत आहे. त्याठीकाणी कोणत्याही शाखेचा (कला, विज्ञान, वाणिज्य) विद्यार्थी येवून मार्गदर्शन घेवू शकणार आहेत. साधारणत: मार्च-एप्रिल दरम्यान हे केंद्र सुरु होणार आहे.

केंद्रामुळे होणार ‘हा’ फायदा

  • - कोणत्या अभ्यासक्रमातून लगेच रोजगार मिळू शकतो, याचा मिळणार अचूक सल्ला

  • - स्वयंरोजगार कोणता व कसा सुरु करता येईल, त्यासाठी कोणत्या शासकीय योजना आहेत, याची मिळणार माहिती

  • - बौद्धिक कल पाहून भविष्याचा मार्ग कोणता निवडावा, यावर मिळणार मोफत मार्गदर्शन

कल चाचणी कशासाठी?

  • - विद्यार्थ्यांची आवड, बौद्धिक कल पाहुन तो कोणता रोजगार किंवा नोकरी करु शकतो, याचा मिळणार अचूक सल्ला, जेणेकरून भविष्यात अडचणी येणार नाहीत

  • - विद्यार्थ्यांच्या मनातील संभ्रम, गोंधळ दूर करून त्याची बौद्धिक (कल) चाचणी घेऊन त्याला त्या क्षेत्रातून कशी मिळेल पुढे जाण्याची संधी, यावर होणार मार्गदर्शन

  • - दहावीनंतर रोजगाराची संधी कोठे, पुढील शिक्षण कोणते घ्यावे, बारावींनतर काय, यावरही मिळणार मोफत मार्गदर्शन

  • - विद्यार्थी व पालक यांच्या मनातील संभ्रम दूर करून त्यांचा कल ओळखून त्यांचे भविष्य सुखदायी व्हावे, असा प्रयत्न केंद्रातून केला जाईल

करिअर मार्गदर्शन केंद्र कोठे असणार...

सोलापूर महापालिकेसमोरील नॉर्थकोट मैदानाजवळ जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योकता मार्गदर्शन केंद्र आहे. त्याच ठिकाणी केंद्र सरकारच्या पुढाकारातून हे केंद्र उभारले जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी केंद्र मंजूर झाले असून त्याठिकाणी समुपदेशनही (यंग प्रोफेशनल) नेमला आहे. ज्यांना करिअर व रोजगारविषयक मार्गदर्शन पाहिजे, त्यांना त्याठिकाणी मोफत मार्गदर्शन मिळणार आहे.

‘या’ केंद्रातून मोफत मार्गदर्शन मिळेल

जिल्ह्यातील बेरोजगार तरूण-तरूणींना रोजगार मिळावा म्हणून दरमहा रोजगार मेळावा घेतला जातो. बेरोजगार तरूणांसह आता दहावी-बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी करिअर व रोजगार मार्गदर्शन केंद्र सुरु केले जाणार आहे. परीक्षेनंतर ज्या विद्यार्थ्यांना पुढे काय करायचे, असा प्रश्न तथा संभ्रम असतो, त्यांना या केंद्रातून मोफत मार्गदर्शन मिळेल.

- हणमंतराव नलावडे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

Video : दगडाच्या काळजाची आई! पोटच्या नकोशा मुलीला रस्त्यावर टाकून गेली पळून; कुत्र्याने बाळाच्या...धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Bharatmala Scheme : भारतमाला योजनेला धक्का: सुरत-चेन्नई महामार्ग रद्द होण्याची शक्यता; नाशिकचे हजारो कोटींचे प्रकल्प अधांतरी

Latest Maharashtra News Updates : रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये गणेश मूर्ती घडवण्याचं काम जोमात

SCROLL FOR NEXT