High-Court-Mumbai 
महाराष्ट्र बातम्या

हॉटेलमधील पार्ट्यांवर न्यायालयाने काय घेतला निर्णय

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल-रेस्टॉरंट-पबमध्ये लावण्यात येणाऱ्या बॉलिवूडच्या गाण्यांवर आता मुंबई उच्च न्यायालयाचा लगाम बसला आहे. हॉटेलचालकांना ही गाणी लावण्यापूर्वी ‘फोनोग्राफिक परफॉर्मन्स लिमिटेड’ची परवानगी घेणे बंधनकारक केले आहे.

हॉटेल व पबमध्येही विविध प्रकारचे आकर्षक कार्यक्रम आयोजित केले जातात. ज्यात बॉलिवूडच्या चित्रपटांतील गाणी मुख्य आकर्षण असतात. मात्र, जर फोनोग्राफिक परफॉर्मन्सचा परवाना नसताना ही गाणी लावली गेली, तर संबंधित हॉटेल-पबवर कारवाई होऊ शकते. ‘पीपीएल इंडिया’ संस्थेकडे सुमारे २५ लाखांहून अधिक गाण्यांची नोंदणी असून विविध भाषांमधील गाण्यांचा यात समावेश आहे. त्यानुसार गाण्यांचा वापर करण्यासाठी संस्थेचे शुल्क आणि परवाना मिळणे अत्यावश्‍यक आहे. याबाबत संस्थेच्या वतीने गतवर्षी न्यायालयात दावा करण्यात आला होता. याच मागणीसाठी संस्थेच्या वतीने पुन्हा न्यायालयात अर्ज करण्यात आला. न्यायालयाने तूर्तास त्यांची मागणी मान्य केली आहे. यावर पुढील सुनावणी २८ जानेवारीला होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup 2026 : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावाची फक्त 'हवा'! बलाढ्य पोर्तुगालला ५२ वर्षांनी वर्ल्ड कप खेळणाऱ्या काँगोने रडवले, धक्कादायक निकाल

T20 WC: धक्कादायक! भारताच्या प्रमुख खेळाडूला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले... सर्व खेळाडू तिच्याभवती जमले, चिंता वाढवणारी घटना

Monsoon Tourism: पावसाने दडी मारताच ताम्हिणी घाट-देवकुंड पर्यटन ठप्प; अंधारबन, खजिना ट्रेकवर शुकशुकाट

Donald Trump: ''नरेंद्र मोदी पंतप्रधान असेपर्यंत भारतावर हल्ला झाला तर..'', डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान अन् जगभरातील नेत्यांच्या भूवया उंचावल्या

‘बी-२’चा ‘जीआर’ महिनाभरात! सोलापुरातील १२५ वर्षे जुन्या चाळींमधील प्रत्येक कुटुंबास मिळणार काही हजारांत जागेची मालकी; आमदार देवेंद्र कोठेंचा यशस्वी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT