Uddhav Thackrey Esakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackrey: "ते असे आहेत... ते तसे आहेत" राहुल गांधींना भेटल्यावर उद्धव ठाकरेंना काय वाटलं?

उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींच्या भेटीनंतर मांडलं मत

अंकिता खाणे (Ankita Khane)

Shivsena Podcast : ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दैनिक ‘सामना’साठी मुलाखत घेतली आहे. त्यांच्या मुलाखतीचा आज दुसरा भाग आहे. या मुलाखतीवेळी उद्धव ठाकरेंनी आपली रोखठोक मतं मांडताना दिसून आले. यावेळी त्यांनी विरोधकांच्या बैठकीवर, महाविकास आघाडी, शिवसेना, राष्ट्रवादी आणि सद्याची राजकीय परिस्थीती या संपुर्ण घडामोडीवर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी भाजपला लक्ष केलं आहे.

मुलाखत घेणाऱ्या संजय राऊत यांनी उध्दव ठाकरे यांना विरोधकांची बैठक आणि राहुल गांधींच्या भेटीवर प्रश्न केला होता. त्यावर उत्तर देताना ठाकरे म्हणाले की, 'राहुल गांधींना यापूर्वी मी तसा भेटलेलो नाही. पण आतापर्यंत त्या लोकांनी करून दिलेले जे समज-गैरसमजच जास्त होते, ‘ते’ असे आहेत.‘ते’ तसे आहेत.‘ते’ हिंदुद्वेष्टे आहेत', असं ठाकरे म्हणाले.

तर 'प्रत्यक्ष भेटल्यानंतर मला असं वाटलं की, राहुल गांधी समजून घेताहेत, ऐकताहेत, त्यांना जे काही वाटतंय ते हळुवारपणे बोलताहेत आणि नुसतं ऐकून घेत नाहीत, तर त्यावर पुढे ती सूचना ते सगळ्यांच्या समोर मांडतात सुद्धा. अशा पद्धतीनेच जर का हे पुढे सुरू राहिलं तर मला वाटत नाही की, पुढे काही अडचण येईल', असंही पुढे उध्दव ठाकरे म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे म्हणजे बाळासाहेबांचे विचार आहेत

'आज माझ्याविरुद्ध अख्खा भाजप आहे. त्यांचा कोणताही नेता आला तर त्यांना उद्धव ठाकरेंशिवाय दुसरे काही बोलता येत नाही. आता खरं तर उद्धव ठाकरेंकडे आहेच काय? पक्ष नाही, शिवसेना तुम्ही चोरली आहे, चिन्ह चोरलं आहे, माझे वडील चोरण्याचा प्रयत्न करत आहात. तरीदेखील तुम्हाला उद्धव ठाकरेंची भीती का वाटते? म्हणूनच मला असं वाटतं की, उद्धव ठाकरे ही एकटी व्यक्ती नाही तर उद्धव ठाकरे म्हणजे बाळासाहेबांचे विचार आहेत', असंही उध्दव ठाकरे म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT