Aaditya Thackeray Esakal
महाराष्ट्र बातम्या

Aaditya Thackeray: आधी गळ्यात गळे अन् आता विरोधी सूर..; राहुल गांधींच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले?

राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू झालेली भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्र राज्यात आहे

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू झालेली भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्र राज्यात आहे. दोन दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत स्वातंत्र्यावीर सावकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे देशभर गोंधळ सुरू झाल्याचे दिसून येत आहे. या सर्व घटनेचे पडदास राज्यातील राजकारणावर उमटताना दिसून येत आहेत. यासंबधी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी याबाबतीत भूमिका स्पष्टपणे मांडली. त्यांच्या भूमिकेशी मी देखील सहमत आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. पण आपण सगळे 50 वर्षांपूर्वी किंवा 100 वर्षांपूर्वी कोण योग्य आणि कोण अयोग्य होतं यावर सगळे भांडायला लागलो, आणि असंच चालत राहिलं तर भविष्यासाठी कोण भांडणार?, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता. तर राहुल गांधी यांच्या वक्तव्याला शिवसेना समर्थन करणार नाही, असं संजय राऊत म्हणाले होते. तर दुसरीकडे माजी उद्धव ठाकरे यांनीही राहुल गांधी यांच्या वक्तव्याला समर्थन दिलं नाही.

दरम्यान, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत ठाकरे गटाच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. स्वत: आदित्य ठाकरे देखील यात्रेत सामील झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Paithan News: सिलिंडरच्या टंचाईवर बायोगॅसची मात; पाचलगावच्या महिलेचा उपक्रम; कृषी विभागाच्या मदतीने उभारले संयंत्र

Nagpur News: युद्धाच्या झळांनी ग्रामीण भाग होरपळतोय; डिझेलअभावी शेतीकामात अडथळा: पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी गर्दी

Latest Marathi News Live Update : भोंदू खरातकडून माइंड रीडिंगच्या नावाखाली महिलांच्या भावनिक आणि मानसिकतेचा फायदा घेत फसवणूक

Supreme Court: सुट्टीवर कोर्टाचा मोठा निर्णय! धार्मिक स्वातंत्र्याला मर्यादा, देशभर सुट्टीची मागणी फेटाळली

Washim News: महामार्गांवरील वृक्षतोडीला थांबवा; शहरातील नागरिकांची न्यायालयात धाव; शंभर वर्ष जुन्या वृक्षावार घाला

SCROLL FOR NEXT