महाराष्ट्र बातम्या

एनसीबी प्रकरणी क्रांती रेडकरांचा काय संबंध? - संजय राऊत

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: मंत्री नवाब मलिक समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर सातत्याने आरोप करत आहेत. तसेच समीर वानखेडे हे मुस्लीम असल्याचा दावा करत त्यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीचा फोटो देखील ट्विट केला होता. त्यावरून त्यांची दुसरी पत्नी क्रांती रेडकरने (kranti redkar letter to cm) मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र लिहिले होते. आज बाळासाहेब ठाकरे असते, तर त्यांना हे मुळीच सहन झाल नसतं. आज बाळासाहेबांची प्रतिमा आम्ही तुमच्या बघतो, असं क्रांती तिच्या पत्रातून म्हणाली होती. त्यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलंय. त्यांनी या पत्राला एकप्रकारे प्रत्युत्तरच दिलं आहे.

संजय राऊत म्हणाले की, एनसीबी प्रकरणी क्रांती रेडकरांचा काय संबंध? ही लढाई एनसीबी आणि इतर अशी सुरु आहे. व्यक्तीश: क्रांती रेडकरांवर कुणी काही टीका केलेली नाहीये. महाराष्ट्रात बाहेरचे अधिकारी येऊन मराठी लोकांना जो त्रास देत आहेत, तो चुकीचा आहे. ते मराठीच आहेत ना? की ते अमराठी आहेत? ज्या प्रकारे दिल्लीतून आरोप सुरु आहे. खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. धाडी टाकल्या जात आहेत. ते पाहता प्रश्न सत्य आणि असत्याचा आहे. क्रांती रेडकर यांच्याविषयी आम्हाला प्रेम आहे. कोणताही अन्याय होणार नाही. बाळासाहेब जरी आज नसले तरी तिच्यावर कसलाही अन्याय होणार नाही. शिवसेना तीच आहे, उद्धव ठाकरे सोबत आहेत. कुठेही कुणावरही अन्याय होणार नाही.

क्रांती पत्रातून नेमकं काय म्हणाली?

''मी लहानपणापासून मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी शिवसेना पाहत लहानाची मोठी झाली आहे. मी एक मराठी मुलगी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श घेऊनच मी वाढले आहे. कुणावर अन्याय करू नये आणि आपल्यावर होणारा अन्याय सहन तर मुळीच करू नये हे दोघांनी शिकविलं. तोच धडा गिरवत आज मी एकटी माझ्या खासगी जीवनावर हल्ला करणाऱ्या उपद्रवी लोकांविरोधात ठामपणे उभी आहे. लढते आहे. सोशल मीडिया आणि त्यावरच लोक फक्त मजा बघतात. मी एक कलाकार आहे. राजकारण मला कळत नाही आणि मला त्यात पडायचं देखील नाही. आमचा काहीही संबंध नसताना रोज सकाळी आमच्या अब्रूची लत्करं चार-चौघांत उधळली जातात. शिवरायांच्या राज्यात एका स्त्रीच्या गरिमेचा खेळ करून ठेवला आहे. विनोद करून ठेवला आहे.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT