Ayodhya Ram Mandir Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ayodhya Ram Mandir: 'राम मंदिराच्या उभारणीत उद्धव ठाकरेंचे योगदान काय?', भाजप-ठाकरे गट भिडले; निमंत्रणावरून राजकारण पेटलं

अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्या अतिमहत्त्वाच्या निमंत्रितांच्या यादीत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव नसल्याने आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्या अतिमहत्त्वाच्या निमंत्रितांच्या यादीत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव नसल्याने आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच विधान परिषदेचे साधे आमदार झालेले असल्याने त्यांचे नाव ‘व्हीव्हीआयपीं’च्या यादीत नसेल, असे सांगत ‘मनसे’चे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावाचा मात्र या यादीमध्ये समावेश करण्यात आला असल्याचा चिमटा काढला. श्रीराम मंदिराच्या कार्यक्रमासाठी अयोध्येत जोरदार तयारी सुरू आहे. व्हीव्हीआयपी लोकांना निमंत्रण पाठविण्यात आले असून उद्धव ठाकरेंना मात्र डावलण्यात आले आहे. राज यांना मात्र सोहळ्याचे निमंत्रण मिळाल्याची चर्चा आहे.

याच मुद्यावरून खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा भाजपवर निशाणा साधताना पंतप्रधान मोदींवर हल्ला केला. ‘मंदिरात जाणारा हा भक्त असतो. पण या देशात मंदिरात जाणारा एकमेव व्हीआयपी म्हणजे नरेंद्र मोदी.’ मोदी हे भगवान विष्णूचे तेरावे अवतार असल्याचे पोस्टर काही ठिकाणी लावण्यात आले आहेत त्यावरून राऊत यांनी सडकून टीका केली. भाजपने आधी कोण व्हीआयपी आणि कोण सामान्य यावर बोलावे असेही राऊत यांनी सुनावले आहे.

‘आम्ही सामान्य म्हणून राम मंदिराच्या लढ्यात उतरलो. तेव्हा आजचे व्हीआयपी कोठे गेले होते? राम मंदिर पाडले तेव्हा ही लोकं कुठे होती?’ असे सवालही राऊत यांनी उपस्थित केले आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी तेव्हा पुढे येऊन रामजन्मभूमी आंदोलनाची जबाबदारी घेतली तेव्हा हे कुठे गेले होते? असाही सवाल त्यांनी भाजपला केला आहे.

उद्धव ठाकरे हे साधे आमदार आहेत. त्यामुळे केंद्राच्या ‘व्हीव्हीआयपी’च्या यादीत ते नसतील; पण राज ठाकरे यांचा मात्र समावेश असेल. अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीत उद्धव ठाकरेंचे योगदान काय? घरात बसून भूमिका घेणे आणि प्रत्यक्ष कारसेवा करणे यात फरक आहे. आम्ही वीस दिवस कारागृहामध्ये होतो. तेव्हा संजय राऊत आणि उद्धव ठाकरे कुठे होते? बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेबाबत दुमत नाही. मात्र जे बोलतायेत ते आयत्या बिळावरचे नागोबा आहेत. असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

SCROLL FOR NEXT