Ajit Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: पालकमंत्री पदावरून नाराजी? मुख्यमंत्र्यांच्या डिनर पार्टीला अजित पवारांच्या गैरहजेरी मागे कारण काय

एकनाथ शिंदेंनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला अजित पवार गैरहजर का राहिले? चर्चांना उधाण

अंकिता खाणे (Ankita Khane)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्याच्या पत्नी लता शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. वांद्रे येथील ताज लॅन्डस् एन्ड या हॉटेलमध्ये काल (गुरूवारी ता. 17) संध्याकाळी 7 वाजता हे स्नेहभोजन पार पडले. अजित पवार गट मंत्रिमंडळात सहभागी झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांसाठी आयोजित केलेले हे पहिलेच स्नेहभोजन होते. या स्नेहभोजनाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दांडी मारल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला सुरूवात झाली आहे.

अजित पवार मुंबईत असताना देखील या स्नेहभोजनाला का उपस्थित राहिले नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अजित पवार यांच्यासोबत बैठकीला उपस्थित असणारे मंत्री देवगिरी बंगल्यावरूनच स्नेहभोजनाला गेले. मात्र अजित पवार देवगिरी वरतीच थांबले. याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजित पवार नाराज नाहीत, परंतु ते स्नेहभोजनाला का गेले नाहीत याचे उत्तर त्यांच्याकडे नाही असं सांगितलं असल्याचं वृत्त एका वृत्तसंस्थेने दिलं आहे.

दरम्यान अजित पवारांना पालकमंत्री पदासाठी जो शब्द देण्यात आलेला होता. तो अद्याप पुर्ण होऊ शकलेला नाही. त्याचबरोबर सोबत आलेल्या मंत्र्याना सरकारमध्ये पाहिजे ते स्वांतत्र्य नसल्याची चर्चा सुरू आहे. यामुळे अजित पवार काही प्रमाणात नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

या स्नेहभोजनासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी(अजित पवार गट) यातील सर्व बडे नेते आणि मंत्री उपस्थित होते. अजित पवार यांनी मात्र या स्नेहभोजनाला दांडी मारली. अजित पवार गटाची बैठक संपल्यानंतर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अदिती तटकरे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. मुंबईत असून पण अजित पवार अनुपस्थित असल्यानं पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत. याबाबतचे वृत्त 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीने दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Inflation: पाकिस्तान संकटात! अन्न टंचाई, डिझेल-LPG महागाईने जनतेचं कंबरडं मोडलं

LPG Crisis : एलपीजी संकटादरम्यान सरकारने आखली मोठी रणनीती, सामान्यांना दिलासा; गॅस सिलिंडर अन् PNG बाबत महत्त्वाची अपडेट समोर

Horoscope : उद्या अश्विनी मेषेर्कचा दुर्लभ योग! मेषसह 'या' 4 राशींना आर्थिक लाभ संभवतो; महिन्याभरात होईल भरभराट, नात्यात कलाटणीचा क्षण

Bihar Politics: ''बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे दोन नेते ठरवणार'', प्रशांत किशोर काय बोलले?

Latest Marathi News Live Update: रत्नागिरीत बंदुकीने गोळ्या झाडून घेत युवकाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT