bhagat singh koshyari 
महाराष्ट्र बातम्या

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कोणती नवी योजना येणार

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पीक कर्जाची थकीत रक्कम २ लाख रुपयांहून अधिक असलेल्या शेतकऱ्यांसाठी नवीन योजना तयार करण्यात येत असून, त्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी आज सांगितले. तसेच पीक कर्जाची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना उत्तेजन देणाऱ्या लवकर नवीन योजना जाहीर केली जाईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

विधिमंडळाच्या एक दिवसीय विशेष अधिवेशनाचा प्रारंभ राज्यपालांच्या अभिभाषणाने झाला.  राज्यपाल या वेळी म्हणाले, राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्‍या जमाती, महिला व तळागाळातील घटकांच्या कल्याणासाठी शासन वचनबद्ध आहे.  

महाराष्ट्र, कर्नाटक संबंधात राज्याने दावा केलेल्या ८६५ गावात राहणाऱ्या मराठी भाषिक जनतेच्या हक्कांचे व विशेषाधिकारांचे संरक्षण करण्याचा पुनरुच्चार राज्यपालांनी या वेळी केला. 

शासनाने सुरू केलेल्या शिवभोजन योजनेच्या माध्यमातून गरीब व गरजू व्यक्तिला केवळ १० रुपयांमध्ये चौरस आहार देण्यात येईल. बळिराजाला साह्य करण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेद्वारे २ लाख रुपयांपर्यंतचे थकित कर्ज माफ करण्यात येणार आहे. ही योजना कालबद्ध रीतीने राबविण्यात येणार असून पीक कर्जाची थकीत रक्कम २ लाख रुपयांहून अधिक असलेल्या शेतकऱ्यांसाठी योजना तयार करण्यात येत असून, त्यास अंतिम रूप देण्यात येत असल्याचे राज्यपालांनी सांगितले. कर्जाची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना उत्तेजन देणाऱ्या लवकर नवीन योजना जाहीर केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. नाशिक, ठाणे, अमरावती व नागपूर येथील आदिवासी विकास विभागाच्या प्रदेशनिहाय विभागांमध्ये टप्प्याटप्प्याने क्रीडा उत्कृष्टता केंद्र किंवा क्रीडा अकादमी निर्माण करण्यात येतील. त्यामध्ये आदिवासी युवकांमधील क्रीडा विषयक निपुणतेस चालना दिली जाईल, असे राज्यपालांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Maharashtra : राज्यात २० जिल्ह्यांना ऑरेंज, येलो अलर्ट; कमी दाबाच्या क्षेत्राचा विदर्भावर परिणाम, पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार

Maratha Reservation: मनोज जरांगे यांची मोठी घोषणा; १५ सप्टेंबरला मुंबईकडे कूच, १९ पासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण

Pilbhit Tiger Reserve: व्याघ्र प्रकल्पात विकेंड सफारी महागली; शनिवार-रविवारचे तिकीट २०० रुपयांवर, काय आहे कारण ?

Team India Live Streaming: सुपर संडे! भारताचे दोन मोठे सामने, Asia Cup Final अन् अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार टी२०; कुठे पाहाणार?

Ukadiche Modak Recipe: केशराचा सुगंध, नारळ-गुळाची गोडी आणि 'हा' एक पदार्थ… बाप्पासाठी असे बनवा स्पेशल उकडीचे मोदक!

SCROLL FOR NEXT