Aurangabad Pre monsoon Light rain in Jalna
Aurangabad Pre monsoon Light rain in Jalna sakal
महाराष्ट्र

पुढील पाच दिवसांसाठी कसं असेल हवामान? IMDचे अ‍ॅलर्ट्स

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे : राज्यात मॉन्सूनची वाटचाल वेगानं सुरु असून कोकणातील काही भागात मॉन्सून दाखल झाला आहे. येत्या चोवीस तासात मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हवामान विभागानं पुढील पाच दिवसांसाठी हवामानाचा इशारा जाहीर केला आहे. वरिष्ठ वैज्ञानिक के एस होसाळीकर यांनी ही माहिती दिली. (What will the weather for the next five days Alerts issued by IMD)

होसाळीकर यांनी यासंदर्भात महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या पावसासंबंधी काही इमेजेस शेअर केले आहेत. यामध्ये पुढील पाच दिवसात राज्यातील कुठल्या भागात पावसाची काय स्थिती असेल? हे दर्शवण्यात आलं आहे. त्यानुसार, आज सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अ‍ॅलर्ट देण्यात आला आहे. तसेच उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांना ग्रीन अ‍ॅलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रासासाठी यलो अ‍ॅलर्ट देण्यात आला आहे.

सोमवार, १३ जून - नंदूरबार, धुळे, जळगाव, पालघर, औरंगाबाद, जालना, बीड, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांना ग्रीन अ‍ॅलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित सर्व भागांना यलो अ‍ॅलर्ट देण्यात आला आहे.

मंगळवार, १४ जून - नंदूरबार, धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड, पालघर, रायगड, रत्नागिरी, सातारा, सोलापूर, सागली, कोल्हापूर या जिल्ह्यांना ग्रीन अ‍ॅलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित सर्व जिल्ह्यांसाठी यलो अ‍ॅलर्ट देण्यात आला आहे.

बुधवार, १५ जून - बुलडाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अ‍ॅलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित सर्व जिल्ह्यांना ग्रीन अ‍ॅलर्ट देण्यात आला आहे.

गुरुवार, १६ जून - या दिवशी देखील बुधवार प्रमाणेच विदर्भातील जिल्ह्यांना यलो अ‍ॅलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रात ग्रीन अ‍ॅलर्ट देण्यात आला आहे. यांपैकी परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

विविध रंगांचे अ‍ॅलर्ट कसे वाचावेत?

रेड अ‍ॅलर्ट - पावसाचा इशारा

ऑरेंज अ‍ॅलर्ट - सतर्कतेचा इशारा

यलो अ‍ॅलर्ट - लक्ष ठेवण्याचा इशारा

ग्रीन अ‍ॅलर्ट - धोक्याची सूचना नाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तुम्ही दहा वर्षांत काय केले हे पाहा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला

ED : ‘ईडी’वर अंकुश! न्यायप्रविष्ट प्रकरणांत आता थेट अटक होणार नाही

Loksabha Election 2024 : मुंबईत आज ‘महासंग्राम’; सांगता सभांमुळे राजकीय तापले वातावरण

Sugar : केंद्र सरकारच्या बंदीमुळे साखर होणार ‘तिखट’; ९० लाख टन साखर अतिरिक्त ठरण्याची शक्यता

अग्रलेख : ‘आप’ भी...?

SCROLL FOR NEXT