Balasaheb Thackeray
Balasaheb Thackeray esakal
महाराष्ट्र

Balasaheb Thackeray: बाळासाहेब गेले... उसळलेल्या गर्दीचं नियोजन नांगरे पाटलांनी कसं केलं?

संतोष कानडे

मुंबईः १४ नोव्हेंबर २०१२. बाळासाहेबांच्या प्रकृतीविषयी शंका निर्माण होत होत्या. कलानगरमध्ये लाखो शिवसैनिक जमायला सुरुवात झाली. १७ नोव्हेंबरला बाळासाहेब गेले. गर्दीच्या समुद्राला नियंत्रित करण्याची जबाबदारी पोलिसांवर होती. आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांनी चोख नियोजनातून परिस्थिती हातात ठेवली. त्यावेळी नेमकं काय झालं, पाहूया.

मराठी माणसासाठी आणि हिंदुत्वासाठी आयुष्य झिजवणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्राच्या किंबहुना देशाच्या राजकारणात दबदबा होता. त्यांचा शिवसेना पक्ष आणि शिवसैनिक कायम आक्रमक आणि आग्रही असायचे. त्यामुळे बाळासाहेबांचे शेवटचे क्षण उच्चकोटीच्या भावनिक स्थित्यंतराचे होते. त्यावेळी परिस्थिती नियंत्रणात ठेवणं मोठं आव्हान होतं. आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे या संपूर्ण परिस्थितीची जबाबदारी होती. एका व्हीडिओमध्ये नांगरे पाटलांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.

हेही वाचाः Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

नागरे पाटील सांगतात, बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती अत्यवस्थ होती. १४ नोव्हेंबरपासूनच मुंबईतल्या कलानगरमध्ये गर्दी जमायला लागली. मोठ्या संख्येने शिवसैनिक जमत होते. दाढी वाढवलेले, गळ्यात सोन्याची चैन असलेले, उंचेपुरे..बलदंड शिवसैनिक आक्रमक होत होते. परिस्थिती वरचेवर चिघळत होती. 'मातोश्री'वर आलेले अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनाही धक्काबुक्की झाली. वरचेवर गर्दी वाढत होती. दगडफेक होती, चपला फेकल्या जात होत्या. सर्वांना बाळासाहेबांना बघायचं होतं.

नांगरे पाटील पुढं सागतात, १७ नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे गेले. गर्दीचं मनोबल सुटत होतं. शिवसैनिक आणि बाळासाहेबांवर प्रेम करणारा प्रत्येकजण पुढे पुढे सरकत होता. त्यावेळी एक ट्रिक कामी आली. ती आत्मघातकी ठरली असती. परंतु सुदैवाने तसं काही झालं नाही. कारण शिवसैनिक कधीही महिलांवर हात उचलत नाही, असं मला माहिती होतं. त्यामुळे पुढे सरकणाऱ्या गर्दीला रोखण्यासाठी महिला पोलिस कर्मचाऱ्यांना आणि महिला कार्यकर्त्यांना पुढे केलं. लाऊडस्पीकरवरुन आवाहन केलं- त्या दिशेला पार्थिव आहे, महिला आहेत तिकडे तुम्ही दगडं मारणार का? मग कुठे गर्दी शांत झाली. सात-आठ लाख लोकं हाताळणं सोपं काम नव्हतं.

अंत्ययात्रेवेळी असं केलं नियोजन

स्व. बाळासाहेब ठाकरे यांना शेवटचं बघावं, असं प्रत्येकाला वाटत होतं. ते रास्तही होतं. परंतु गर्दी मोठी होती. या गर्दीला नियंत्रणात ठेवणं अवघड होतं. गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी आयपीएस विश्वास नांगरे पटलांनी होमवर्क केलेला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे तीन प्रकारचं नियमन गरजेचं होतं. यामध्ये गर्दी, ट्रॅफिक आणि घातपात न होऊ देणं. त्यासाठी मग ८ ते १० पोलिस कर्मचाऱ्यांचे गट केले गेले. प्रत्येक गटात हेल्टमेट असलेले, लाठी असलेले आणि शिल्ड असलेल्या पोलिसांचा समावेश होता. शिवाय दोन-तीन ट्रॅफिक पोलिस कर्मचारीही होते. या तुकडीची जबाबदारी एका सब इन्स्पेक्टरकडे दिली, अशी तीन तुकड्यांच्या तीन सब इन्स्पेक्टरची जबाबदारी एका इन्स्पेक्टरकडे आणि तीन इन्स्पेक्टरची जबाबदारी एका एसीपीकडे. अशा पद्धतीने पिरॅमिड बनवली. एकेक कर्मचारी कुठेही ठेवले नाहीत. या टीमला मॅनेजमेंट करणारी यंत्रणा उभारली. त्यामुळे गर्दीला मॉनिटरिंग करता आलं.

विश्वास नांगरे पाटील यांच्या या नियोजनामुळे त्या दिवशी मुंबईत कुठेही वाहतूक खोळंबा झाला नाही, गर्दीमध्ये काही अघटीतही घडलं नाही. शोकाकूल वातावरणात बाळासाहेबांना अखेरचा निरोप देण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Team India Squad T20 WC : संघाची घोषणा होण्याआधी मोठी अपडेट; टीम इंडियाचा उपकर्णधार बदलणार... पांड्याची जागा घेणार 'हा' खेळाडू?

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Latest Marathi News Live Update : विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT