Raj Thackeray, Meenatai and Balasaheb Thackeray
Raj Thackeray, Meenatai and Balasaheb Thackeray 
महाराष्ट्र

'राजचं वागणं तिला सहन झालं नसतं'; बाळासाहेबांनी उलगडला माँसाहेबांच्या स्वभावाचा पैलू

सकाळ डिजिटल टीम

माँसाहेब अर्थात मीनाताई ठाकरे (Meenatai Thackeray) यांचा आज (६ जानेवारी) जयंती दिन. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या आयुष्यात पत्नी मीनाताई ठाकरे यांचा सिंहाचा वाटा होता. शिवसेना घडवण्यात माँसाहेबांनी वेळोवेळी केलेल्या मदतीचे अनेक संदर्भ आपल्याला पहायला मिळतात. मात्र त्यांची हळवी बाजू ही फक्त बाळासाहेब ठाकरेंनाच माहित होती. माँसाहेबांच्या स्वभावाचे विविध पैलू अनेकांच्या मुलाखतींतून ऐकायला मिळतात. अशाच एका मुलाखतीत खुद्द बाळासाहेब हे माँसाहेबांच्या भावनिक स्वभावाविषयी व्यक्त झाले होते. राज ठाकरे (Raj Thackeray) शिवसेनेपासून दुरावल्याचं माँसाहेबांना सहन झालं नसतं, असं ते म्हणाले. (Shivsena)

माँसाहेब असत्या तर राज ठाकरे शिवसेनेपासून दुरावले असते का, असा प्रश्न एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बाळासाहेबांना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, 'एवढं झालं असतं की नसतं हा एकेकाच्या स्वभावावर अवलंबून आहे. माणूस किती प्रेमळ असतो आणि केव्हा निर्दयी होतो, हे पहावं लागतं. निर्दयीपणाची सीमा असते की नसते याची मला कल्पना नाही पण निर्दयीपणाचा कळस होऊ शकतो. ते तिला सहन झालं नसतं.'

बाळासाहेबांनी त्यांच्या आयुष्यात सहन केलेल्या मोठ्या धक्क्यांविषयी ते पुढे म्हणाले, 'मी तीन धक्के सहन केले. १९९५ साली माँ गेली. त्यानंतर १९९६ साली १० फेब्रुवारीला माझ्यावर बायपासची शस्त्रक्रिया झाली. एप्रिल २० या तारखेला माझा मोठा मुलगा बिंधूमाधवचा अपघात झाला. मी नेहमी म्हणतो, माँ असताना बिंदूमाधव गेला असता तर ती हार्ट अटॅकनंही गेली असती. तिला सहन झालं नसतं. ती खूप सात्विक आणि धार्मिक होती. घराण्याबद्दल तिला प्रचंड प्रेम आणि आपुलकी होती. राजच्या बाबतीतसुद्धा जे झालं, ते ती सहन करू शकली नसती. राजचं वागणं तिला सहन झालं नसतं.'

बाळासाहेबांच्या आयुष्यात माँसाहेबांचं स्थान काय आहे, असं विचारला असता त्यांनी खिशातून एक फोटो काढला. हा फोटो माँसाहेबांचा होता. महत्त्वाच्या ठिकाणी जाताना खिशात त्यांचा फोटो नेहमीच ठेवतो, असं त्यांनी सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बापरे! बॉल समजून पकडला बॉम्ब ... 13 वर्षीय मुलाचा स्फोटात मृत्यू , नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

Satara Lok Sabha : उदयनराजेंनी आधी घड्याळाकडं पाहिलं अन् बरोबर 7 वाजून 7 मिनिटांनी केलं मतदान

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

Latest Marathi News Live Update: ''ही माझी शेवटची निवडणूक आहे'', काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचे वक्तव्य

SCROLL FOR NEXT