Rahul Narwekar  
महाराष्ट्र बातम्या

Shivsena Case : व्हीप कोणाचा योग्य?, आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय कधी? ; विधानसभा अध्यक्षांची महत्वाची माहिती

Sandip Kapde

Shivsena Case : सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर याप्रकरणी निर्णय घेणार आहेत. लवकरात लवकर निर्यण घेणार आहे, निर्णयाला किती वेळ लागेल. हे सांगता येत नाही, अशी माहिती राहुल नार्वेकर यांनी दिली.

राहुल नार्वेकर म्हणाले, मी न्यायालयाच्या निकालाचे स्वागत करतो. राजकीय पक्षाचा व्हीप गृहीत धरण्यात यावा. कोणत्या राजकीय पक्षाचा व्हिप योग्य, याचा निर्णय देखील न्यायालयाने अध्यांकडे सोपवला आहे. योग्य चौकशी होईल. त्यानंतर निर्णय घेऊ. घटनात्मक बाबींचा विचार करुन आम्ही निर्णय घेऊ.

कोणता गट हा राजकीय पक्ष आहे. हे ठरलं तर दुसऱ्या गटाला पहिल्या गटाचा व्हीप लागू होणार का? यावर नार्वेकर म्हणाले, राजकीय पक्षाचा व्हिप लागू होणार. राजकीय पक्ष ठरलेल्या गटाच्या अध्यक्षांनी नेमलेला व्हीप ग्राह्य धरण्यात येईल, असे नार्वेकर म्हणाले.

न्यायालयाने भरत गोगावले यांनी नियुक्ती बेकायदेशीर ठरवली आहे. न्यायालयाने म्हटले आहे की सुनिल प्रभू हे प्रतोद होते. गोगावलेंची नियुक्ती चुकीची होती. यावर नार्वेकर म्हणाले, भरत गोगावले यांना आम्ही नियुक्त केलं नाही. आमच्या कार्यालयाने केवळ पक्षाने दिलेल्या माहितीची नोंद घेतली आहे.

ठाकरे गटाचे आमदार निलंबित होतील का? -

जर सदस्याने व्हीपचं उंलंघन केलं. तर तो निलंबित होतो. सदस्याने पक्षाविरोधी कारवाई केली तर तो निलंबित होतो. याचिका बघून निर्णय घ्यावा लागेल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Mumbai: पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुरु होणार, दररोज ५० गाड्या धावणार; प्रवाशांना दिलासा मिळणार!

Congress High Drama : "कसले अध्यक्ष?"; विचारताच काँग्रेस कार्यालयात तुफान राडा, नेत्यांवर थेट चप्पल-बुटांचा मारा!

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT