Navneet Rana  Sakal
महाराष्ट्र बातम्या

'तुम्हालाही तुरुंगात टाकू', राणांनी शिवसेना खासदारावर केले होते गंभीर आरोप

संजय राऊतांनी राणा दाम्पत्याची जोडी म्हणजे बंटी,बबलीची जोडी असल्याची खोचक टीका केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : महाराष्ट्रातील अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) सध्या चर्चेत असून, त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री निवास्थानासमोर हनुमान चालिसाचे (Hanuman Chalisa) पठण करण्याचा निर्धार केला आहे. या सर्वामध्ये शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राणा दाम्पत्याची जोडी म्हणजे बंटी आणि बबलीची जोडी असल्याची खोचक टीका केली आहे. दरम्यान, नवनीत राणा आणि शिवसेनेचा वाद काही नवीन नसून यापूर्वीदेखील राणा यांनी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्यावर गंभीर आरोप केले होते. (Navneet Rana Shivsena controversy)

'तुम्ही महाराष्ट्रात कसे फिरता, तुरुंगात टाकू'

नवनीत राणा यांनी सचिन वाझे (Sachin Waze) यांचा मुद्दा गेल्या वर्षी लोकसभेत उपस्थित केला होता. त्यावेळी संसदेत बोलताना राणा म्हणाल्या होत्या की, भाजपचे (BJP) सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी स्वतः देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना सचिन वाझे यांना परत बोलवण्यास सांगितले होते. मात्र, फडणवीस यांनी याला नकार दिला होता. त्यानंतर राज्यात ठाकरे सरकार आले आणि त्यांनी सचिन वाझेंना पुन्हा सेवेत घेतले. या सर्व घडामोडींनंतर याचा योग्य तपास होणे गरजेचे असल्याचे गरजेचे असल्याचे राणा यांनी म्हटले होते.

दरम्यान, या मुद्द्याप्रकरणी आपल्याला शिवसेनेचे खासदर अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी वाझेंचा मुद्दा पुन्हा उपस्थित केल्याने धमकावल्याचा आरोप केल्याचे पत्र नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना लिहले होते. यात त्यांनी तुम्ही महाराष्ट्रात कसे फिरता ते मी बघेन आणि तुरुंगात टाकेन, अशी धमकी सावंत यांनी दिल्याचे राणा यांनी पत्रात नमुद केले होते. मात्र, अरविंद सावंत यांनी हे आरोप फेटाळून लावले होते.

कोण आहेत नवनीत कौर राणा

नवनीत कौर राणा या दक्षिण भारतीय चित्रपटांची प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांनी बहुतेक तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले असून, त्यांनी दर्शन या कन्नड चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्याशिवाय त्यांनी लव्ह इन सिंगापूर या मल्याळम चित्रपटाव्यतिरिक्त पंजाबी चित्रपट लाड गए पेंचमध्येही काम केले आहे. नवनीत राणा यांनी 2014 मध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, यात त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर त्यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवत शिवसेनेचे आनंदराव विठोबा यांचा सुमारे 37 हजार मतांनी पराभव केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koregaon Bank Election 2026 : कोरेगाव मतदारसंघात पुन्हा ईश्वर चिठ्ठीचा योगायोग; पाच वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती! 2021 मध्ये खत्री चिठ्ठीवर विजयी, तर 2026 मध्ये मानेंना नशिबाची साथ

Shambhuraj Desai Satara Bank Election Victory : सातारा जिल्हा बँकेत घडला इतिहास! स्व. शिवाजीराव देसाईंनंतर 45 वर्षांनी देसाई घराण्याची दमदार एन्ट्री; पालकमंत्र्यांचा उर आला भरुन

IND vs NZ, ODI: रोहित शर्मा न्यूझीलंडमध्ये घडवणार इतिहास? विश्वविक्रमांसह ७ मोठे पराक्रम करण्याची संधी

Latest Marathi News Live Update : भाजपमध्ये मोठे फेरबदल होण्याचे संकेत

Mhada House: फक्त २० लाखांत म्हाडा देणार १,४०० घरे, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कोकण मंडळाचा पुढाकार

SCROLL FOR NEXT