raj thakceray esakal
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray : सत्ता आल्यावर ती जाण्याची प्रक्रिया सुरू होते; राज ठाकरेंचा भाजपसह माध्यमांना टोला

सकाळ डिजिटल टीम

Pimpri Chinchwad News - पिंपरी चिंचवड येथे आयोजित पत्रकार सन्मान सोहळ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपसह माध्यमांवर जोरदार टीका केली. तसेच सत्ताधारी पराभूत होत असतात, पण विरोधक विजय होत नसतात अशा शब्दात राज ठाकरेंनी सत्ताधारी भाजपला नाव न घेता टोला लगावला.

राज ठाकरे यांनी पत्रकारांवर बोलताना म्हणाले की, ग्रामीण महाराष्ट्रात पत्रकार परिषदा घेऊच नये, असं वाटतं. कारण त्यांच्याकडे प्रश्नच नसतात. सध्या याला काय वाटतं? त्याला काय वाटत? तेच चालू आहे. वृत्तवाहिन्यांवर तेच सुरू आहे. उत्तम काम करणारे अनेक पत्रकार आहेत. मात्र राजकारणाची भाषा घसरली आहे. राजकारणातील अनेक नेते वाहियातपणे बोलत आहेत. कारण तुम्ही त्यांना दाखवतात.

राज ठाकरे पुढं म्हणाले, तुम्ही मध्यमांनी दक्षता घ्यावी. मागचा पुढचा अभ्यास नसतो, इतिहास माहित नसतो. त्यामुळे मी काहींना उत्तर देतच नाही. प्रत्येकाचा एक काळ असतो. सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन येत नसतो. सत्ता ज्या दिवशी हातात येते, त्याच दिवशी ती जायला लागते. ती टिकवायची किती, तेवढचं तुमच्या हातात असतं. विरोधी पक्ष कधी जिंकत नसतो. सत्ताधारी पक्ष हारत असतो, असंही राज यांनी नमूद केलं.

दरम्यान अटल बिहार वाजपेयी आणि बाळासाहेब ठाकरेंच्या सभांना मोठी गर्दी व्हायची. पण मतं मिळत नव्हते. मात्र हळूहळू काळ बदलतो, त्यावेळी गर्दी मतांमध्ये येते. कोणतेही चढउतार न पाहता, पत्रकार म्हणून काहीही विचारतात. तुम्ही असचं काहीही विचारणार असले तर मी राज ठाकरे आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

Navratri Day One: आज करा पहिल्या माळेच्या देवी शैलीपुत्रीची पूजा! जाणून घ्या पूजाविधी, नैवेद्य आणि मंत्र

‘या’ मुजरा शैलीतील गाण्यासाठी रेखांनी 3 दिवस केली फक्त बोटांची प्रॅक्टिस; जुन्या गाण्याचा भन्नाट किस्सा माहितीये का?

मेट्रो-इंटरनेट सुरू करा, बॅरिकेड्स हटवा; कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईपर्यंत...; सुप्रीम कोर्टाचे दिल्ली पोलिसांना आदेश

CJP आंदोलनाचा व्यापाऱ्यांना फटका, २ हजार कोटींचं नुकसान; व्यवसाय ठप्प, CTIने केली 'ही' मागणी

SCROLL FOR NEXT