file photo
file photo 
महाराष्ट्र

उद्योगपतीच्या सेवकाचे बूट चोरीला जातात तेव्हा...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः अवघी दुनिया ज्याच्या मुठीत असते त्या उद्योगपतीच्या सुरक्षा रक्षकाची पादत्राणे चोरीला जाणे ही सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलिसांसाठी तशी नामुष्कीचीच बाब. पण तो कलंक धुवून काढण्यात मुंबई पोलिसांना सुयश आले. दोन महिन्यांनंतर का होईना, पण त्यांनी त्या  बूटचोराला अटक केलीच आणि ‘जियो मुंबई पोलिस’ अशी शाबासकी मिळविली.

रवींद्र प्रताप सिंग (३८) हे त्या सुरक्षा रक्षकाचे नाव. एका बड्या उद्योगपतीच्या संरक्षणाचे काम तो करतो. त्याची पादत्राणेही त्या उद्योगपतीच्या दर्जास साजेशीच. तब्बल साडेबारा हजार रुपयांची. २३ सप्टेंबर रोजी तो ते नवीन बूट घालून सकाळी सकाळी बाबुलनाथ मंदिरात गेला होता. अर्ध्या तासाने बाहेर आला, तर बूटस्टँडवरून ते ब्रँडेड बूट गायब. या घटनेने तेव्हा मोठीच खळबळ माजली.

मंदिरातील एका महिला कर्मचाऱ्याचा एका बूटचोरावर संशय होता. 
गेल्या सोमवारी, ११ तारखेला तो  आरोपी बाबुलनाथ मंदिर परिसरात घुटमळत असताना त्या महिलेने त्याला पाहिले. तिने तत्काळ गावदेवी पोलिसांना कळविले. तेही तातडीने धावले. प्रकरणच तेवढे गंभीर होते. त्यांनी तातडीने त्या उद्योगपतीच्या सेवकाच्या बूटचोरास अटक केली. त्याचे नाव पंकज ईश्वर शरण रावत चौहान (वय ४४). या कामगिरीबाबत पोलिसांचे मोठे कौतुक होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

Latest Marathi News Live Update : भाजपचा रायबरेलीतून उमेदवार ठरला; या नेत्याला मिळाली संधी

SCROLL FOR NEXT