When Assembly elections 2024 in Maharashtra ESakal
महाराष्ट्र बातम्या

Assembly Elections 2024: महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक कधी? तुफान पाऊस, सणासुदीचे दिवस, आयोगाचे आस्ते कदम...

Maharashtra Assembly Elections 2024: मुंबईत आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली. यात आयोगाने महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतल्याचे सांगितले. तसेच विधानसभेच्या तारखा लवकरच जाहीर करू असे सांगितले आहे.

Vrushal Karmarkar

महाराष्ट्रात सर्वांनाच विधानसभा निवडणुकीची प्रतिक्षा लागून राहिली आहे. यासाठी निवडणूक आयोगाचे पथक मुंबईत दाखल झाले होते. निवडणूक आयोगाकडून विधानसभेचा आढावा घेण्यात आला आहे. त्यानंतर आज मुंबईतील ट्रायंडेट हॉटेलमध्ये निवडणूक आयोगाच्या पथकाने पत्रकार परिषद घेतली आहे. यात त्यांनी महाराष्ट्रात निवडणूका कधी होणार यावर भाष्य केले आहे. निवडणुका घेण्यास आयोगाने अजून वेळ मागितला आहे. यामुळे आता निवडणूक अजून लांबली आहे.

राजीव कुमार यांनी सांगितले की, आगामी निवडणुकीची तयारी कशी केली जात आहे हे सांगण्यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. 'आपले मत आपला हक्क' हा कार्यक्रम सुरू आहे. या दौऱ्यात त्यांनी बसपा, आप, सीपीआय, मनसे, शिवसेना, यूबीटी, मनसे अशा ११ पक्षांची भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीची तारीख जाहीर होण्यापूर्वी सणांची काळजी घ्यावी, असे सर्वांनी मिळून सांगितले आहे.

ते म्हणाले की, निवडणुकीची तारीख मध्यभागी असावी, अशी पक्षांची मागणी आहे. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत काही गैरसोयी दिसल्या, मतदारांनी त्यांना सामोरे जाऊ नये. फेक न्यूजच्या प्रसारावर बंदी घालावी. तसेच आम्ही २६ नोव्हेंबर आधी महाराष्ट्रात निवडणुका घेऊ, असं त्यांनी स्पष्ट केले आहे. राजीव कुमार म्हणाले, दोन दिवस राजकीय पक्षांशी चर्चा झाली. सण आणि उत्सवानंतर निवडणुका जाहीर कराव्यात, असे राजकीय पक्षांचे म्हणणे आहे.

निवडणूक आयोगाने सांगितले की, “आम्ही ११ राजकीय पक्षांशी चर्चा केली. काही पक्षांनी पैशाच्या ताकदीवर अंकुश ठेवण्याची विनंती केली. काहींनी मतदान केंद्र दूर असल्याच्या तक्रारी केल्या तर काहींनी वृद्धांसाठी वाहनांची व्यवस्था करण्याची मागणी केली. काही पक्षांनी पोलिंग एजंट एकाच मतदारसंघातील असावा, अशी विनंती केली. मतदान केंद्रांवर मोबाईल फोन घेऊन जाण्यास बंदी घालण्याची मागणीही पक्षांनी केली. तसेच उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे की नाही हे जाणून घेण्याचा अधिकार मतदारांना आहे; पक्षकारांनाही कळवावे. यासंदर्भात सर्व पक्षांना जाहिराती द्याव्या लागणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT