Pikavima Yojana sakal
महाराष्ट्र बातम्या

शेतकऱ्यांना कधी मिळणार पीकविमा? मूग, उडीदाचे उत्पन्न निश्चित; आता सोयाबीन, तूर, मका, कांद्याचे काम अंतिम टप्प्यात, किती मिळणार पीकविमा, वाचा...

मागील खरीप हंगामात पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांना नुकसानीच्या प्रमाणात जानेवारीपासून विमा संरक्षित रक्कम मिळणार आहे. सध्या मूग, उडीद या पिकांचे कापणी प्रयोग संपून त्या पिकांच्या उत्पन्नाची माहिती शासनाला पाठविण्यात आली आहे. आता बाकीच्या पिकांची माहिती पाठविण्याची कार्यवाही सुरू आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : मागील खरीप हंगामात पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांना नुकसानीच्या प्रमाणात जानेवारीपासून विमा संरक्षित रक्कम मिळणार आहे. सध्या मूग, उडीद या पिकांचे कापणी प्रयोग संपून त्या पिकांच्या उत्पन्नाची माहिती शासनाला पाठविण्यात आली आहे. आता बाकीच्या पिकांची माहिती पाठविण्याची कार्यवाही सुरू आहे.

पीक कापणी प्रयोगानंतर आलेले उत्पन्न (उंबरठा उत्पन्न) व मागील सात वर्षांतील चांगल्या पाच वर्षांतील उत्पन्नाची तुलना होते. त्यातून सध्याच्या अपेक्षित उत्पन्नाची तुलना होऊन उंबरठा उत्पन्नानुसार जोखमेची रक्कम निश्चित होते. त्यातही प्रत्येक पिकांसाठी मंडळे, तालुके अधिसूचित करण्यात आले आहेत. त्यानुसार त्या मंडळ व तालुक्यातील पीकविमा भरलेल्या बाधित शेतकऱ्यांना विमा संरक्षित रक्कम दिली जाते.

एखाद्या मंडळ किंवा तालुक्यातील सर्वच पिकाचे नुकसान झाले, पण त्याठिकाणी त्या पिकांसाठी अधिसूचित केलेले क्षेत्र नसल्यास विमा मिळत नाही. आता कोणत्या तालुक्यातील किंवा मंडळातील किती शेतकऱ्यांना पीकविमा परतावा मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उत्पन्नाची माहिती संकलित करणे सुरु

सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये मूग, उडीद, सोयाबीन, कांदा, तूर, मका अशा पिकांचे उत्पन्न घेतले जाते. खरीप पीकविमा योजनेंतर्गत काही पिकांचे कापणी प्रयोग झाले आहेत. काहींचे कापणी प्रयोग काही दिवसांत होतील. त्यानंतर उत्पन्नाची माहिती शासनाला पाठविली जाते. त्यानुसार नुकसानीचे प्रमाण निश्चित होऊन विमा कंपन्यांकडून पात्र शेतकऱ्यांना भरपाई मिळेल.

- शुक्रचार्य भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: नितीश कुमारांचा मुलगा होणार उपमुख्यमंत्री; मुख्यमंत्री भाजपचा? पक्षाच्या मोठ्या नेत्याने दिले 'हे' संकेत

Virat Kohli : कोहलीने Puma सोबतचा करार संपवला; आता नव्या भारतीय कंपनीसोबत 40 कोटींची नवी इनिंग सुरू!

Latest Marathi News Live Update : येवला तालुक्यातील उंदीरवाडी शिवारात बिबट्याच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरार

Password Psychology: लोक एक्सच्या नावाचा पासवर्ड का ठेवतात? मानसशास्त्र सांगतं ३ मोठी कारणं

'बच्चे बडे हो जाते हैं, लीग खतम नही होती!' Wasim Akram ची आयपीएल वेळापत्रकावर टीका; म्हणाला, PSL No. 1

SCROLL FOR NEXT