zp schools sakal
महाराष्ट्र बातम्या

शिक्षकांचा पगार कधी होणार आहे? वेतन अधीक्षकांना हॉटेल मालक, देणेकऱ्यांकडून विचारणा; दरमहा 1 तारखेला पगार अपेक्षित, पण विलंबामुळे व्यवहाराचे कोलमडले नियोजन

शिक्षकांचा पगार प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला अपेक्षित असून तसे शासन निर्णय देखील झाले. मात्र, सध्या ५ ते १० तारखेदरम्यान पगार होत आहे. त्यामुळे शिक्षकांच नातेवाईक किंवा देणेकरीच वेतन अधीक्षकांना शिक्षकांचा पगार कधीपर्यंत होईल, अशी विचारणा करत असल्याचा अनुभव अधिकाऱ्यांनी सांगितला.

तात्या लांडगे

सोलापूर : शिक्षकांचा पगार प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला होणे अपेक्षित असून तसे शासन निर्णय देखील झाले आहेत. मात्र, सध्या ५ ते १० तारखेदरम्यान पगार होत आहे. त्यामुळे शिक्षकांच्या कुटुंबातील लोक, नातेवाईक किंवा देणेकरीच वेतन अधीक्षकांना शिक्षकांचा पगार कधीपर्यंत होईल, अशी विचारणा करत असल्याचा अनुभव अधिकाऱ्यांनी सांगितला.

सोलापूर जिल्ह्यात खासगी प्राथमिक शाळांची संख्या ३५० पर्यंत असून खासगी अनुदानित माध्यमिक शाळांची संख्या ६५३ तर कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या १३८ आहे. या शाळांवरील शिक्षकांची संख्या १० हजारांहून अधिक आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी शिक्षकांच्या पगारासाठी सरकारकडून एक महिन्याच्या पगाराचे पैसे अगोदरच मिळत होते. पण, कोरोनानंतर ही परिस्थिती बदलली आणि दरमहा पगारासाठी लागणारा निधी सरकारकडून कोषागार कार्यालयाकडे वितरित होतो. अनेकदा निधी यायला काही दिवस विलंब होतो, शाळांकडून अचूक बिले सादर व्हायला वेळ लागतो. त्यामुळे शिक्षकांचे वेतन चार-पाच दिवस उशिराने होते, अशी सद्यःस्थिती आहे.

पण, शिक्षकांचा पगार १ ते ५ तारखेपर्यंत होईल आणि आपले देणे वेळेत मिळेल, या आशेने अनेकांनी काहींना व्याजाने, उसनवारीवर पैसे दिले आहेत. बहुतेक शिक्षकांनी बॅंकांचे कर्ज (वाहन, गृह, वैयक्तिक लोन) घेतले आहे. त्यामुळे एक-दोन दिवस पगाराला उशीर झाला की त्रयस्थ लोकच वेतन अधीक्षकांना संपर्क करून शिक्षकांचा पगार कधीपर्यंत होईल, अशी विचारणा करत आहेत.

एका हॉटेल चालकाचा वेतन अधीक्षकांना कॉल

दोन महिन्यांपूर्वी शिक्षकांच्या पगारासाठी चार-पाच दिवस विलंब झाला होता. फेब्रुवारीचा पगार निधीअभावी लांबला होता. त्यावेळी एका हॉटेल चालकानेच खुद्द वेतन अधीक्षकांना फोन लावला आणि शिक्षकांच्या पगारी अजून झाल्या नाहीत का, कधीपर्यंत होतील, अशी विचारणा केली होती. असे अनुभव वेतन अधीक्षक कार्यालयास नेहमीच येऊ लागल्याचे सूत्रांनी सांगितले.

नेहमीच येतात असे अनुभव

शिक्षकांचा पगार वेळेत होतो, पण कधी कधी निधी किंवा अन्य तांत्रिक कारण, सुट्ट्यांमुळे विलंब होतो. त्यावेळी काही वेळा त्रयस्थ व्यक्तीच शिक्षकांच्या पगाराबद्दल विचारणा करतात ही वस्तुस्थिती आहे.

- दीपक मुंढे, वेतन अधीक्षक (माध्यमिक), सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूर-रत्नागिरी महामार्ग ८ पदरी असणार का? शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाची महत्त्वाची माहिती देत एकनाथ शिंदेंनी उत्तरच सांगितलं!

LPG Supply in India : युद्धामुळे LPG चा पुरवठ्याचं संकट; इंटरनेटवरही होणार परिणाम?

IPL 2026 Schedule Announced : आयपीएलच्या १९व्या पर्वाचे वेळापत्रक जाहीर; RCB vs SRH यांच्यात सलामी; पहिल्या २० सामन्यांचं टाईमटेबल

Pune crime cctv: पुणं हादरलं! मित्राची थट्टा केली म्हणून आला राग, सपासप वार करत केला खून! सीसीटीव्ही व्हायरल

'मुरांबा' मालिकेत मोठा ट्विस्ट; अक्षय आणि रमाच्या आयुष्यात 'ती' पुन्हा येणार; प्रेक्षक मात्र संतापले

SCROLL FOR NEXT