सोलापूर : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपचे माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या जातीच्या दाखल्याविरुद्ध सोलापूर जिल्ह्यातील चौघांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे लेखी तक्रार केली. त्यानंतर समितीच्या तत्कालीन अध्यक्षांनी तपासाअंती प्रमाणपत्र बनावट असल्याचा निकाल दिला. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रमाणपत्राची फेरपडताळणी सुरू झाली. त्यानुसार दक्षता पथकाचा दुसरा अहवालही प्राप्त झाला, पण समितीला पूर्णवेळ अध्यक्ष नसल्याने अजूनही डॉ. महास्वामींच्या जात प्रमाणपत्रावरील अंतिम निकाल होऊ शकलेला नाही.
लोकसभेची पाच वर्षे संपली, नवीन निवडणूक होऊन आता आठ महिने झाले, तरीदेखील माजी खासदार डॉ. महास्वामी यांच्याकडील जातीचे प्रमाणपत्र खरे आहे की बनावट, याचे उत्तर सोलापूर जिल्ह्याला मिळालेले नाही. डॉ. महास्वामी यांनी ज्या मुद्द्यांवर उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला तो मान्य झाला आणि त्यांच्या प्रमाणपत्राबद्दल फेरचौकशी झाली. न्यायालयाच्या आदेशानुसार सहा महिन्यात निकाल अपेक्षित होता, पण समितीला काही अडचणींमुळे ते शक्य झाले नाही आणि त्यांनी मुदतवाढ घेतली.
या काळात डॉ. महास्वामींच्या वडिलांच्या जन्म-मृत्यू नोंदीचे रजिस्टर परराज्यातील न्यायवैद्यकशास्त्र प्रयोगशाळेकडून तपासण्यात आले. अक्कलकोट तहसीलदारांनी त्याचा अहवाल समितीला दिला आणि दक्षता पथकाचाही अहवाल समितीला प्राप्त झाला आहे. त्यावर समितीने डॉ. महास्वामींचे म्हणणे देखील घेतले आहे. मात्र, समितीला मिळालेल्या मागील दोन्ही अध्यक्षांकडे सोलापूरच्या समितीचा पदभार अतिरिक्त होता. त्यामुळे माजी खासदारांच्या जात प्रमाणपत्राबद्दलची सुनावणीच सुरु होऊ शकली नाही. सध्याचे अध्यक्ष रविराज फल्ले यांच्याकडे तर तब्बल १० जिल्ह्यांच्या समितीचा कार्यभार असल्याने ते अजूनपर्यंत सोलापूरला आलेले नाहीत. त्यामुळे अद्याप डॉ. महास्वामींच्या जात प्रमाणपत्र पडताळणीचा निकाल प्रलंबितच आहे.
समितीचे अध्यक्ष आल्यावर सुरु होईल सुनावणी
माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या जात प्रमाणपत्राबद्दल दक्षता पथकाचा अहवाल प्राप्त झाला आहे. तत्पूर्वी, त्यांच्या वडिलांच्या जन्मृ-मृत्यू नोंदीसंदर्भातील गौडगाव येथील ग्रामपंचायतीकडील नोंदवहीची देखील न्यायवैद्यकशास्त्र प्रयोगशाळेकडून अहवाल प्राप्त झाला आहे. आता समितीचे अध्यक्ष आल्यानंतर त्यासंदर्भातील सुनावणी सुरु होईल.
- सचिन कवले, सदस्य सचिव, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सोलापूर
पाच वर्षे झाली, तरीपण नाही अंतिम निकाल
२०१९ मध्ये देशात ११ एप्रिल ते १९ मे दरम्यान एकूण ७ टप्प्यांत लोकसभेची निवडणूक पार पडली. सोलापूर मतदारसंघातून भाजपतर्फे डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांना उमेदवारी मिळाली आणि त्यांनी निवडणूकही जिंकली. निकालानंतर काही दिवसांतच काही जणांनी त्यांच्याकडील जातीचा दाखला बनावट असल्याची तक्रार जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे केली. तक्रारीला आता पाच वर्षे झाली, पण अजूनही अंतिम निकालाची प्रतीक्षाच आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.