mantralay sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यात प्राध्यापक भरती कधी? विद्यापीठांमध्ये ६५९ अन्‌ महाविद्यालयांमध्ये ५०१२ प्राध्यापकांची पदे रिक्त; दोनदा ‘जीआर’ बदलले, आता तिसऱ्याची प्रतीक्षा, वाचा...

राज्यातील अकृषिक विद्यापीठांमधील ६५९ प्राध्यापकांच्या भरतीसाठी यापूर्वीच मान्यता मिळाली आहे. पण, भरतीसंदर्भात पहिल्यांदा ८०-२० टक्क्यांचा फॉर्म्युला ठरला. त्यात बदल होऊन ७५-२६ गुणांची टक्केवारी ठरली. पण, आता मुलाखतीच्या २५ गुणांमध्ये आणखी वाढ होईल आणि त्याचा नवा शासन निर्णय निघण्याची शक्यता आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील अकृषिक विद्यापीठांमधील ६५९ प्राध्यापकांच्या भरतीसाठी यापूर्वीच मान्यता मिळाली आहे. पण, भरतीसंदर्भात पहिल्यांदा ८०-२० टक्क्यांचा फॉर्म्युला ठरला. त्यात बदल होऊन ७५-२६ गुणांची टक्केवारी ठरली. पण, आता मुलाखतीच्या २५ गुणांमध्ये आणखी वाढ होईल आणि त्याचा नवा शासन निर्णय निघण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे भरतीसाठी यापूर्वी दोनवेळा अर्ज केलेल्या उमेदवारांना पुन्हा नव्याने अर्ज करावा लागू शकतो.

सध्या अकृषिक विद्यापीठांतील २०१९ मध्ये रिक्त झालेली ६५९ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. विद्यापीठ व उच्च महाविद्यालयांमधील प्राध्यापकांची भरती महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) माध्यमातून व्हावी, यासाठी तत्कालीन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आग्रही होते. ते उपराष्ट्रपती झाल्यावर नव्या राज्यपालांच्या माध्यमातून उच्च शिक्षण विभागाने नवा फॉर्म्युला निश्चित केला. त्यातही पहिल्यांदा ८० टक्के गुण कागदपत्रांसाठी आणि २० टक्के गुण मुलाखतीला द्यायचे निश्चित झाले. त्यानुसार इच्छुक उमेदवारांकडून ११ ते १२ प्रतीत अर्ज मागविण्यात आले.

दरम्यान, काही दिवसांनी नवा शासन निर्णय निघाला आणि त्यानुसार ७५ गुण कागदपत्रांसाठी आणि २५ गुण मुलाखतीस ठरले. उमेदवारांनी पुन्हा नव्याने अर्ज केले. आता अर्जांची छाननी झाली, पण भरतीची कार्यवाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आचारसंहितेमुळे थांबली आहे. तितक्यात आणखी नवा शासन निर्णय निघेल आणि मुलाखतीचे गुण आणखी वाढवले जातील, अशी शक्यता विद्यापीठांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. तसे झाल्यास भरती आणखी लांबणार असून उमेदवारांना तिसऱ्यांदा अर्ज करावा लागेल, असेही बोलले जात आहे.

वित्त विभागाकडून अद्याप मंजुरी नाही

अकृषिक विद्यापीठांशी संलग्नित सुमारे पाच हजार उच्च महाविद्यालयांमध्ये सद्य:स्थितीत प्राध्यापकांची पाच हजार १२ पदे रिक्त आहेत. या पदभरतीस वित्त विभागाची मान्यता आवश्यक असून उच्च शिक्षण विभागाने तसा प्रस्ताव देखील पाठविला आहे. मात्र, मंत्र्यांनी अनेकदा घोषणा केली असली तरीदेखील या पदभरतीस मान्यता मिळाली नसून त्यासंदर्भातील कोणतेही पत्र आमच्या विभागाला प्राप्त नसल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

आचारसंहिता संपल्यावर सुरु होईल भरतीची कार्यवाही

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील टीचिंग-नॉनटीचिंग पदांसाठी यापूर्वीच अर्ज मागविले आहेत. त्याची छाननी झाली असून आचारसंहिता संपल्यावर शासनाच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही होईल.

- डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्र कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस आयुक्तांना २ वर्षे पूर्ण! सोलापुरात गुन्हे घटले; तपासाचा टक्का वाढला, ‘डीजेमुक्त सोलापूर’ व भोंगेमुक्त सोलापूर मोहिमेला ठोस कृतीची जोड, वाचा...

Mumbai Pune Expressway Traffic Jam: मुंबई-पुणे ‘द्रुतगती महामार्गा’वर गॅस टँकर उलटला!, मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

WPL 2026: जेमिमाहची दिल्ली कॅपिटल्स सलग चौथ्यांदा फायनलमध्ये, गुजरातचा केला पराभव; जेतेपदासाठी RCB शी लढणार

Mumbai Airport incident : मुंबई एअरपोर्टवर भीषण विमान दुर्घटना टळली! ; एअर इंडिया अन् इंडिगो विमानांची पंख एकमेकांना धडकली

मोठी बातमी! ‘टीईटी’त साडेचार लाखातील चार लाख भावी शिक्षक नापास; मराठीचा १२ टक्के तर इंग्रजीचा निकाल ५.४४ टक्के, ३६ जणांचा निकाल ठेवला राखून, वाचा...

SCROLL FOR NEXT