Sharad Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: राष्ट्रवादीत मोठे फेरबदल होण्याची शक्यता; 'या' सुत्राने होणार पक्षात नव्या निवडी?

राष्ट्रवादी राज्यातही ‘भाकरी’ फिरवणार

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रीय कार्यकारिणीत बदल केल्यानंतर आता राज्यातही ‘भाकरी’ फिरविण्याची तयारी सुरू केल्याचे चित्र आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदातून मुक्त होत पक्षसंघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर पक्षांतर्गत घडामोडींना वेग येत असल्याचे संकेत आहेत.

पक्षात सामाजिक समीकरण साधताना प्रमुख पदावर ‘मराठा-ओबीसी’ असे सूत्र साधण्याचा प्रयत्न पक्षातर्फे केला जाणार आहे. यामध्ये प्रदेशाध्यक्षपदावर अजित पवार यांना संधी मिळण्याचे दाट संकेत असून, आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यभरात संघटन मजबूत करण्याची रणनीती असेल.

अजित पवार यांना प्रदेशाध्यक्षपद मिळाले तर विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद ओबीसी समाजातील नेत्याकडे दिले जाईल, हे स्पष्ट आहे.

विरोधी पक्षनेतेपदासाठी ओबीसी नेत्यांमधून धनंजय मुंडे यांना संधी मिळण्याची शक्यता अधिक असली, तरी नवा आणि आक्रमक चेहरा म्हणून जितेंद्र आव्हाड यांचेही नाव चर्चेत आहे. यावर आता पक्षश्रेष्ठी कोणता निर्णय घेतात हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

राज्यात महाविकास आघाडीची वज्रमूठ अबाधित असताना राष्ट्रवादीने राज्यात नंबर एकचा पक्ष होण्याचा निर्धार केला आहे. यासाठी अजित पवार यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा द्यावी, असे कार्यकर्त्यांसह अनेक आमदारांचे मत आहे.

त्यातच आजपर्यंत पक्षसंघटनेत कोणतेही पद अजित पवार यांनी भूषविलेले नाही. त्यामुळे जर त्यांना पक्षसंघटनेत पद द्यायचेच ठरले तर ते प्रदेशाध्यक्ष हेच असेल, असे मानले जाते. दरम्यान, १८ जुलैपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वीच हे बदल होतील, अशी चिन्हे आहेत.

प्रदेशाध्यक्षपदासाठी भुजबळही इच्छुक

पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज पत्रकार परिषद घेत आपणही ओबीसी नेता म्हणून प्रदेशाध्यक्ष अथवा विरोधी पक्षनेतेपदाच्या स्पर्धेत असल्याचे सूतोवाच केले. ते म्हणाले, की काँग्रेसमध्ये पूर्वीपासून ‘मराठा-ओबीसी’ असे समीकरण राबविले जाते.

भाजपनेदेखील ओबीसी समाजातील चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रदेशाध्यक्षपद दिले. त्यामुळे जर प्रदेशाध्यक्ष मराठा असेल, तर विरोधी पक्षनेता ओबीसी असायला हवा.

याच धर्तीवर अजित पवार प्रदेशाध्यक्ष झाले तर विरोधी पक्षनेतेपदावर ओबीसी समाजातील जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे यांच्यासह माझाही विचार व्हावा, असे स्पष्ट मत भुजबळ यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT