Shivsena_EknathShinde_UddhavThackeray 
महाराष्ट्र बातम्या

...तर शिवसेनेचं धनुष्यबाण गोठवलं जाऊ शकतं; तज्ज्ञ काय म्हणतात जाणून घ्या?

दोन्ही गटांनी शिवसेनेवर दावा केला असून त्यांच्यामध्ये चिन्हासाठी लढाई सुरु झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटानं सातत्यानं आम्हीच खरी शिवसेना आहोत असा दावा केला आहे. तर शिवसेना ही आमचीच असल्याचं उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे. दोन्ही बाजूंनी शिवसेना पक्षावर दावा केला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण आता निवडणूक आयोगाकडं गेलं आहे. निवडणूक आयोगानं शिवसेना आमची असा दावा करणाऱ्या दोन्ही गटांना यासंदर्भातील कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, शिवसेनेचं चिन्ह गोठवलं जाऊ शकतं. यावर घटनातज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या. (while Shiv Sena symbol bow and arrow can be frozen Find out what the experts say)

घटनातज्ज्ञ अनंत कळसे म्हणतात, घटनेनं राजकीय पक्षाला तसेच राजकीय पक्षाच्या चिन्हाला मान्यता देण्याचं काम हे सर्व अधिकार निवडणूक आयोगाकडे असतात. त्यामुळं शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे हे दोन्ही गट आता निवडणूक आयोगात गेले आहेत. इथं खरी शिवसेना आमचीच असा दावा केला आहे. आठ ऑगस्टपर्यंत दोन्ही गटांना आपलं म्हणणं कागदपत्रांसह निवडणूक आयोगापुढं मांडायचं आहे. त्यांनी चिन्हावरही दावा केला आहे. हरीश साळवे यांनी देखील शिंदे गटाकडून युक्तीवाद करताना सुप्रीम कोर्टात सांगितलं की, आम्ही शिवसेना पक्ष सोडलेला नाही, आम्ही शिवसेनेतच आहोत पण पक्ष नेतृत्वाशी आमचे मतभेद आहेत. त्यामुळं आम्हाला फूट असं म्हणता येणार नाही.

खरंतर शिंदे गटाला आम्ही शिवसेना सोडलेली नाही असं म्हणावचं लागेल कारण जर त्यांनी आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो असा दावा केला तर त्यांना लगेचच दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागेल. त्यामुळं त्यांनी आता हा दावा करुन त्यांनी निवडणूक आयोगाकडं भूमिका मांडली की, पक्षाचं चिन्ह आम्हालाच देण्यात यावं आणि आमचा पक्ष हाच खरा शिवसेना पक्ष, असंही कळसे यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसच्या फुटीवेळी बदलावं लागलं होतं चिन्ह

यामध्ये मागची घटना तपासली तर जेव्हा १९६९ मध्ये काँग्रेस पक्ष फुटला होता तेव्हा काँग्रेसचं चिन्ह बैलजोडी होतं. त्यावेळी निवडणूक आयोगानं इंदिरा काँग्रेस आणि संघटना काँग्रेस या दोन्ही पक्षांना त्यांची बाजू मांडायला लावली होती. यामध्ये संघटनेत किती पदाधिकारी आहेत, संघटनेवर किती पकड आहे, तालुकाध्यक्ष किती? अशी तपासणी आणि कागदोपत्री तपासणी केली होती. जवाहरलाल नेहरुंच्या काळापासून काँग्रेसला मिळालेलं बैलजोडी हे चिन्ह शेवटी निवडणूक आयोगानं गोठवून त्याऐवजी गाय-वासरु आणि इतर चिन्हं देण्यात आलं होतं.

दोन्ही गटांना मिळू शकतात चिन्हांचे पर्याय

यापार्श्वभूमीवर शिवसेनेच्याबाबतीतही शिंदे गटानंही प्रत्येक पातळीवर पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आहे. हे त्यांना सिद्ध करावं लागेल तसेच ठाकरेंकडेही काही पदाधिकारी राहतील. त्यामुळं दोघांनी जर पक्षचिन्हावर दावा करणं हे दोघांनाही कठीण जाऊ शकतं. त्यामुळं चिन्हाचा जो वाद आहे त्यामध्ये धनुष्यबाण गोठवलं जाऊ शकतं. यानंतर निवडणूक आयोगाकडून त्यांना दोन्ही गटांना प्रत्येकी तीन चिन्हांचे पर्याय देतील आणि त्यांना त्यातून एक निवडायला सांगतील. पण याला बराच काळ जाऊ शकतो कारण सुप्रीम कोर्टातही यावर सुनावणी होणं बाकी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

IND A vs AUS A, 1st ODI: पाटीदार लढला, पण बाकी सारे ढेपाळले; भारताचा संघ १४९ वर ऑलआऊट, ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

SCROLL FOR NEXT