Pradnya Rajeev Satav esakal
महाराष्ट्र बातम्या

Pradnya Rajeev Satav : प्रज्ञा सातव यांच्यावर अज्ञात इसमाचा हल्ला; भाषण सुरु असतांनाचा प्रकार

संतोष कानडे

मुंबईः दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला झाल्याचा प्रकार आज घडला आहे. यासंदर्भात त्यांनीच ट्विटरवरुन माहिती दिली आहे.

आमदार प्रज्ञा सातव यांनी सांगितलं की. आज कळमनुरी तालुक्यात दौऱ्यासाठी जात असतांना एका ठिकाणी अचानक एक अज्ञात इसम गाडीकडे धावला. त्यानंतर आम्ही पटकन गाडीत बसून दरवाजे बंद केले. पुढे नियोजित कार्यक्रमासाठी गेले असता भाषण सुरु असतांना त्याच इतमाने मागून ओढलं. मात्र उपस्थितांना त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं.

या धक्कादयक घटनेने खळबळ उडाली आहे. याची माहिती स्वतः प्रज्ञा सातव यांनी ट्विट करुन दिली. त्या म्हणाल्या की, आज कसबे धवंडा गावात (ता. कळमनुरी) माझ्यावर अमानुष हल्ला झाला. एका अज्ञात व्यक्तीने माझ्यावर मागून हल्ला केला. मला जखमी करण्याचा हा गंभीर प्रयत्न होता आणि माझ्या जीवाला धोका आहे. महिला लोकप्रतिनिधीवर अशा पद्धतीने भ्याड हल्ला झाल्याचं त्यांनी नमूद केलं.

दरम्यान, हल्ला केलेल्या अज्ञात इसमाला तातडीने लोकांनी बाजूला ओढलं. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. हा हल्ला नेमका का आणि कुणी केला, याबाबत स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाही. पोलिस प्रकरणाचा तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT