Chandrakant Patil on Sanjay Raut  e sakal
महाराष्ट्र बातम्या

विश्वप्रवक्त्यांना 'हा' अधिकार कोणी दिला?; चंद्रकांत पाटलांचा टोला

शिवसेनेसह प्रवक्ते संजय राऊत यांच्यावरही चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या सहाव्या जागेवरुन राज्यात सुरु असलेला खल आता संपला आहे. शिवसेनेनं आपला उमेदवार निश्चित केल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे. पण याचे राजकीय पडसाद अद्याप उमटतच आहेत. यावरुन शिवसेनेवर टीका करणाऱ्या चंद्रकांत पाटलांना उत्तर देताना संजय राऊत यांनी पाटलांनी चोंबडेपणा करु नये असं म्हटलं आहे. यावर आता चंद्रकांत पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Who gave world spokespersons the right to interfere everywhere says Chandrakant Patil)

चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत शिवसेनेसह संजय राऊत यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, "मी शिवाजी महाराजांचा वंशज नाही, हे सामान्यज्ञान आहे. पण हिंदुत्वविरोध्यांसोबत चाललेल्यांना शिवरायांची मक्तेदारी कुणी दिली? तुम्ही शब्दांचे पक्के आणि बाकीचे सगळेच खोटारडे, यावर शेंबडं पोर तरी विश्वास ठेवेल? आणि हो... सगळीकडे ढवळाढवळ करण्याचा अधिकार विश्वप्रवक्त्यांना कुणी दिला?" अशा शब्दांत चंद्रकात पाटील यांनी शिवसेनेच्या भूमिकेवर टीका केली तर संजय राऊत यांनाही फटकारलं.

राज्यसभा निवडणुकीतून माझार घेत असल्याचं जाहीर करताना संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करताना त्यांनी शब्द फिरवल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका करताना "मुख्यमंत्र्यांना शिवरायांच्या पुतळ्यासमोर उभं करून खरंखोटं करावं" असं म्हटलं होतं. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांना पत्रकारांनी विचारले असता, त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर तिखट शब्दात टीका केली होती.

"प्रत्येक राजघराण्याचे काही राजकीय लागेबांधे आहेत, हे संबंधच घेऊन पुढं जावं लागतं. इथे व्यक्तिगत काहीच नसतं. चंद्रकांत दादा कोण? ते वंशज आहेत का शिवाजी महाराजांचे? ते कोण ठरवणारे? त्यांनी 2019 साली शब्द कोणी मोडला ते आधी सांगाव. शब्द मोडण्याची परंपरा कोणाची आहे, हे 2019 ला सर्वांनी पाहिलंय. हा विषय छत्रपती संभाजी आणि शिवसेनेतील आहे, इतरांनी मध्ये चोंबडेपणा करू नये, आमचं आम्ही बघून घेऊ" असा टोला संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : कर्जाच्या पैशातून मोदींचा केक कापणार? वाढदिवस साजरा करणे म्हणजे आर्थिक गुन्हा, संजय राऊतांचे राज्य सरकारवर ताशेरे

Latest Marathi News Updates : कांद्याचे दर घसरले, शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

जरा आवरा अन् Google Gemini ला स्वत:चे पर्सनल फोटो देण्यापूर्वी ही बातमी वाचा... नाहीतर वेळ निघून जाईल, तज्ज्ञांचा इशारा

कलाकार हवा तर असा ! दशावतारचं यश पाहून हिंदी मीडियाने केलं दिलीप प्रभावळकरांचं कौतुक "बॉलीवूडला लाज वाटायला.."

Rahuri Accident: 'दुचाकींच्या अपघातात एक ठार, एक जखमी'; दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर भीषण धडक

SCROLL FOR NEXT