महाराष्ट्र बातम्या

चंद्रकांतदादांचा वारसदार कोण? भाजपकडून सोलापूर, पुणे की सांगलीकरांना मिळणार संधी? 

संतोष सिरसट

सोलापूर ः पुणे पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा हक्काचा मतदारसंघ मानला जातो. मागील दोन निवडणुकीत याठिकाणहून माजीमंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे विधान परिषदेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे ही जागा राखणे भाजपच्यादृष्टीने प्रतिष्ठेचे झाले आहे. पण, त्या दोन निवडणुकांची व आताची स्थिती यामध्ये खूप फरक पडला आहे. राज्यातील सत्ता महाविकास आघाडीकडे आहे. त्यामुळे काहीही झाले तरी ही जागा खेचून घेण्याच्या तयारीत महाविकासआघाडी आहे. भाजपकडून पाटील यांचा वारसदार म्हणून कोणाचे नाव निश्‍चित केले जाते याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. 

पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा आपल्याकडेच राखण्यासाठी भाजपकडून यंत्रणा कामाला लागली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग चालू होण्यापूर्वी मतदार नोंदणीची प्रक्रिया भाजपच्यावतीने मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली होती. त्यानंतर कोरोनाच्या संसर्गामुळे त्याला ब्रेक बसला होता. मात्र, आता निवडणूक जाहीर झाल्यानंतर निवडणुकीची तयारी पक्षाच्यावतीने सुरु झाली आहे. निवडणूक जाहीर झाली असली तरी पक्षाचा उमेदवार अद्यापही निश्‍चित झालेला नाही. गुरुवार (ता. 12) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे भाजपकडे अद्यापही एक आठवड्याची मुदत उमेदवार निश्‍चित करण्यासाठी आहे. पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या पाच जिल्ह्यातील पदवीधर मतदार आपला प्रतिनिधी विधान परिषदेवर पाठविणार आहेत. यापूर्वी दोनवेळा भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांना या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. मात्र, मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुण्यातील कोथरुड मतदारसंघातून विजय मिळविल्यामुळे त्यांचा वारसदार ठरविताना पक्षाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. ज्या कोथरुडचे प्रतिनिधीत्व माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी केले होते. त्यांनी आता पदवीधर मतदारसंघासाठी आपली दावेदारी पक्षाकडे मांडली आहे. एवढेच नाही तर पक्षाने डावलल्यास त्यांनी मनसेमध्ये जाण्याची तयारी केल्याची चर्चाही सोशल मीडियात जोरदारपणे सुरू आहे. कुलकर्णी यांनी पक्ष सोडणे पक्षाला परवडणारे नाही. त्यामुळे त्यांना संधी द्यायची की त्यांची पुन्हा एकदा समजूत काढायची याचा विचार पक्षश्रेष्ठींमध्ये सुरु आहे. 
सांगली भाजपचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरु आहे. माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांचे ते बंधू आहेत. त्यांचा सातारा जिल्ह्यात साखर कारखाना आहे. त्यामुळे पदवीधरची उमेदवारी आपल्यालाच मिळेल यादृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. पुणे भाजपचे शहर सरचिटणीस राजेश पांडे यांच्या नावाचीही चर्चा सुरु आहे. संघ परिवारातील उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. कुलकर्णी व पांडे हे दोन्ही इच्छुक पुण्यातील आहेत. त्यामुळे त्यांच्यापैकी कुणाला संधी मिळणार हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

1500 हिंदू मुलींचं धर्मांतर करणारा छांगूर उर्फ पीर बाबा कसा झाला 300 कोटींचा मालक? ATS तपासातून धक्कादायक माहिती उघड

Latest Marathi News Updates : गोरेगावमध्ये ट्रक-बस अपघात: सहा प्रवासी जखमी, बसचालक ताब्यात

Viral Video: लोकांनी ऊर्जामंत्र्यांना विचारले २४ तासांत फक्त ३ तास ​​वीज मिळते... मंत्री म्हणाले जय श्रीराम... व्हिडिओ व्हायरल

Pune Cyber Police : नवीन सायबर ठाण्यांच्या प्रस्तावास मंजुरी द्यावी : आमदार सिद्धार्थ शिरोळे

Tobacco Ban: तंबाखूच्या बेकायदेशी विक्रीवर आणणार प्रतिबंध; ‘वर्ल्ड ॲन्टी काउंटर फिटिंग डे’निमित्त ‘पीएमआय इन इंडिया’चा मनोदय

SCROLL FOR NEXT