राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने देशभरातील 9 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून धैर्यशील पाटील यांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान भाजपने या निवडणुकीसाठी पाटील यांना संधी देत मास्टरस्ट्रोक खेळला असल्याची चर्चा आता राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. कारण लोकसभा निवडणुकीनंतर भाजपचे राज्यसभेचे दोन खासदार लोकसभेत गेले. यानंतर या दोन जागा रिक्त झाल्या होत्या.
दरम्यान भाजपच्या या दोन जागांवर पक्षातील अनेकांनी फिल्डिंग लावली होती. मात्र, भाजपने यातील एक जागा राष्ट्रवादीला दिली तर दुसऱ्या जागेवर धैर्यशील पाटील यांना संधी दिली. त्यामुळे भाजपमधील अनेकांचे राज्यसभा उमेदवारीचे स्वप्न भंगले आहे.
रायगडचे शेतकरी कामगार पक्षाचे माजी नेते आणि माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी मार्च 2023 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता.
धैर्यशील पाटील हे पेनचे माजी आमदार असून त्यांनी 2014 आणि 2019 मध्ये तिथून विधानसभेच्या निवडणुका लढवल्या आहेत. यात 2014 मध्ये त्यांचा सुमारे 4 हजार मतांनी पराभव झाला होता. तर 2018 मध्ये भाजपकडून त्यांना 24 हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता.
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील रिक्त झालेल्या दोन जागांसाठी जाहीर करण्यात आलेल्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नितीन पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. ते उद्या (बुधवारी) उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या वेळेस जागा वाटप करताना सातारा लोकसभा मतदारसंघ भाजपने त्यांच्याकडे घेतला होता. त्याचवेळेस पीयूष गोयल यांची रिक्त होणारी राज्यसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार या जागेवर नितीन पाटील उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले आणि पीयूष गोयल यांची लोकसभेवर निवड झाल्यानंतर त्यांच्या राज्यसभेच्या या दोन जागा रिक्त झाल्या आहेत. या दोन जागांसह देशातील १२ रिक्त जागांसाठी ३ सप्टेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. बुधवारी (ता. २१) अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.