Who is Hemant Dabhekar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Hemant Dabhekar: हेमंत दाभेकरची भेट घडवून आणली म्हणून शिवसेनेच्या निरीक्षकाची हकालपट्टी; श्रीकांत शिंदेंसोबत नेमकं काय घडलं?

Who is Hemant Dabhekar: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गुंड हेमंत दाभेकर याला सोबत नेल्याचा ठपका ठेवत अनिकेत जावळकर यांची निरीक्षक पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

शिवसेना शिंदे गटातील अनिकेत जावळकर यांची निरीक्षक पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गुंड हेमंत दाभेकर याला सोबत नेल्याचा ठपका ठेवत अनिकेत जावळकर यांची निरीक्षक पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. गुंड हेमंत दाभेकर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाला उपस्थित होता.

कोण आहे हेमंत दाभेकर? (Who is Hemant Dabhekar)

हेमंत दाभेकरवरती खंडणी, अपहरण, हत्या अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. हेमंत दाभेकर हा कुख्यात गुंड शरद मोहोळचा साथीदार होता. किशोर मारणे हत्या प्रकरणी शरद मोहोळ सोबत दाभेकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दाभेकर शरद मोहोळसोबत शिक्षा भोगत होता. हेमंत दाभेकर सध्या जामिनीवर बाहेर आहे.

दरम्यान खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाला गुंड हेमंत दाभेकर उपस्थित असल्याचे फोटो विरोधकांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून शेअर केले आहेत. पुणे शहरातील गुंड श्रीकांत शिंदे यांना शुभेच्छा देताना फोटोत आहे. खासदार संजय राऊत यांच्यासह काही नेत्यांनी हा फोटो टि्वट केला आहे. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. पुण्यातील हा गुंड कोण? याबाबत चौकशी राज्य सरकारकडून पुणे पोलिसांना करण्यात आली. त्यावेळी हा व्यक्ती पुण्यातील कुख्यात गुंड हेमंत दाभेकर असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याला श्रीकांत शिंदे यांच्यापर्यंत आणणाऱ्या शिवसेनेच्या युवासेना पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक अनिकेत जावळकर यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

अनिकेत जावळकर यांची हकालपट्टी

श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाला कुख्यात गुंड हेमंत दाभेकर याला आणल्याबाबत अनिकेत जावळकर यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी अनिकेत जावळकर यांच्यावर कारवाई केली. त्यांची पश्चिम महाराष्ट्र निरीक्षकपदावरुन हकालपट्टी केली. त्याच्या पदाधिकाऱ्याच्या हकालपट्टीचे पत्र काढण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah: ''शक्य तेवढ्या लवकर आपल्या देशात निघून जा'', अमित शाहांचा इशारा; 'ती' जमीन बीएसएफकडे सुपूर्द

Pimpri News : फुगेवाडीत सलग मृत्यूंनी खळबळ; हातभट्टी दारूची चर्चा, पोलिसांचा इन्कार

Latest Marathi News Live Update : सिंहस्थ कुंभमेळा ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन येत्या ११ जूनला होणार

Property Card Maharashtra : महापालिका क्षेत्रातील 7/12 उतारे बंद; मिळकतपत्रिका देण्याचा निर्णय, शहरातील जमिनींसाठी 'प्रॉपर्टी कार्ड' व्यवस्था लागू

चीनने पाठ फिरवली, तेव्हा भारताने वाचवले प्राण; आफ्रिकेत भारतीय औषधांचा डंका आणि 'आरोग्यदूत' प्रतिमा!

SCROLL FOR NEXT