महाराष्ट्र बातम्या

कोण आहे केपी गोसावी? आर्यनसोबतचा सेल्फी झाला होता व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

आर्यन एका ठिकाणी बॅग घेऊन बसलेला असताना एका व्यक्तीने काढलेला सेल्फीही चर्चेत आला होता.

एनसीबीने कारवाई केल्यानंतर या प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केली गेली. यानंतर क्रूझवरचे फोटो, व्हिडिओ, कारवाईवेळचे काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यामध्ये आर्यन एका ठिकाणी बॅग घेऊन बसलेला असताना एका व्यक्तीने काढलेला सेल्फीही चर्चेत आला होता. हा सेल्फी एनसीबीच्या अधिकाऱ्याने कारवाई करताना काढल्याचं म्हटलं जात होतं.

एनसीबीने खुलासा करत संबंधित व्यक्ती एनसीबीचा अधिकारी नाही आणि फोटो कारवाईच्या आधी काढलेला असल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर सेल्फी काढणारी व्यक्ती कोण अशीही चर्चा रंगली होती. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दोन व्यक्तींची नावे घेतली त्यापैकी एक केपी गोस्वामी या व्यक्तीने सेल्फी काढला असल्याचं म्हटलं जात आहे.

मुंबईत कार्डेलिया क्रूझवर एनसीबीने केलेल्या कारवाईबाबत आता महाविकास आघाडीतील मंत्री नवाब मलिक यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. एनसीबीने केलेली कारवाई खोटी आहे असंच म्हणावं लागेल असं त्यांनी म्हटलंय. कारवाईवेळचे जे फोटो व्हायरल झाले ते क्रूझवरचेच होते याचे पुरावे एनसीबीने द्यावे. याशिवाय मनीष भानुशाली कोण आहे याचीसुद्धा माहिती मिळायला हवी. या प्रकरणात तो पुढे दिसत होता. संबंधित व्यक्तींच्या जवळ असणारा मनीष भानुषाली कोण याचा उलगडा व्हायला हवा अशी मागणी नवाब मलिक यांनी केली. तसंच केपी गोस्वामी याचे नाव घेत नवाब मलिक यांनी प्रश्न विचारला की, अधिकारी अशा व्यक्तींच्या माध्यमातून खंडणी घेतात का?

नवाब मलिक यांनी नाव घेतलेला केपी गोस्वामी हा केपीजी ड्रिम्स सोल्युशन कंपनीचा मालक आहे. फेसबुकच्या माध्यमातून नोकरीची ऑफर देण्याचं काम यातून केलं जायचं. तीन वर्षांपूर्वी २०१८ मध्ये त्यानं नोकरीचे आमिष दाखवून युवकाची फसवणूक केल्याचं समोर आलं होतं. पुण्यातील एका २२ वर्षीय तरुणाला मलेशियात हॉटेलमध्ये नोकरी देण्याचं आमिष दाखवलं होतं. त्यानतंर संबंधित व्यक्तीकडून तीन लाख रुपये घेऊन फसवणूक केल्यानंतर केपी गोस्वामी विरोधात फरासखाना पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली होती. याबाबत २०१८ मध्ये पुणे मिररने वृत्त प्रसिद्ध केले होते.

केपी गोसावी याच्या सेल्फीवरून यांनी सचिन सावंत यांनी भाजपसह एनसीबीच्या कामावर शंका व्यक्त केली. खाजगी लोक क्रूझवरील एनसीबी छाप्यात कसे? कोणत्या अधिकाराने? भाजपचा उपाध्यक्ष व एक फसवणूकीचा आरोपी यात आरोपींना ताब्यात घेताना कसे दिसतात? यांच्या गाडीवर "पोलीस" पाटी कशी? NCB ने त्यांचे काम भाजपाला दिले आहे का? अशी प्रश्नांची सरबत्तीच सावंत यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१०० टक्के पेट्रोलचा पर्याय हवा, E20 जनता पार्टीची मागणी; २४ तासात लाखो फॉलोअर्स, कुणी सुरू केली आणि काय आहेत मागण्या?

Milk Dairy License: दूध डेअरींना मोठा दिलासा! तुकाराम मुंढेंच्या आदेशानंतर नियम न पाळता कारवाई; परवाने निलंबनाला हायकोर्टाची स्थगिती

Latest Marathi News Live Update : जंतर-मंतर आंदोलन प्रकरणात मोठी घडामोड; PM मोदी, केंद्र सरकारविरोधातील सोशल मीडिया पोस्ट हटविण्याचे दिल्ली पोलिसांचे आदेश

Team India Schedule: झिम्बाब्वे दौरा संपला, आता टीम इंडिया कधी दिसणार अ‍ॅक्शनमध्ये, जाणून घ्या पुढच्या मालिकेचे वेळापत्रक

Sahasrakund Waterfall Remains Dry: जुलैअखेरही प्रसिद्ध सहस्रकुंड धबधबा कोरडाच, तर ‘सीता न्हाणी’ धबधबा प्रवाही

SCROLL FOR NEXT