Who is Rahul Narwekar Sakal
महाराष्ट्र बातम्या

Who is Rahul Narwekar: शिवसेना ते भाजप व्हाया NCP, असा आहे अपात्रतेचा निर्णय घेणाऱ्या नार्वेकरांचा थरारक राजकीय प्रवास

Rahul Narwekar: महाराष्ट्राच्या राजकारणातील आजचा दिवस महत्त्वाचा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांना पक्षांतरविरोधी कायद्यांतर्गत अपात्र ठरवण्याचा निर्णय सभापती राहुल नार्वेकर देणार आहेत.

राहुल शेळके

Who is Rahul Narwekar: महाराष्ट्राच्या राजकारणातील आजचा दिवस महत्त्वाचा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांना पक्षांतरविरोधी कायद्यांतर्गत अपात्र ठरवण्याचा निर्णय सभापती राहुल नार्वेकर देणार आहेत. अशा स्थितीत सभापतींनी शिंदे आणि त्यांच्या आमदारांना अपात्र ठरवले तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद कोणाकडे राहणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Legislative Assembly Speaker Rahul Narwekar)

या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. विधानसेभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला हा निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरणार आहे. या निमित्ताने राहुल नार्वेकर कोण आहेत, त्यांचा राजकीय प्रवास कसा आहे ते जाणून घेऊ

भाजपचे आमदार नार्वेकर यांचे शिवसेना आणि राष्ट्रवादीशी जवळचे संबंध आहेत. नार्वेकर हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर यांचे जावई आहेत. नाईक महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती होते.

राहुल नार्वेकर हे विधानसभेचे सर्वात तरुण अध्यक्ष असून त्यांनी पहिल्यांदाच विधानसभा जिंकली आहे. राहुल नार्वेकर हे मुंबईतील कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य होते.

त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यासोबत युवा सेनेतही काम केले आहे. राहुल नार्वेकर हे मुंबई उच्च न्यायालयातही वकील आहेत. राहुल नार्वेकर यांना कायद्याची जाण असल्याने भाजपने त्यांना अध्यक्ष केले. अशा स्थितीत भविष्यात कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी राहुल नार्वेकर भाजपचे भालेदार म्हणून पुढे येतील. एकनाथ शिंदे सरकारने आपल्या रणनीतीचा भाग म्हणून हा निर्णय घेतला होता.

2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे व्यवसायाने वकील आहेत. त्यांचे वडील सुरेश नार्वेकर हे बृहन्मुंबई महानगरपालिकेत (BMC) नगरसेवक होते. त्यांचा भाऊ मकरंद दुसऱ्यांदा बीएमसी वॉर्ड क्रमांक 227 मधून नगरसेवक झाला आहे. त्यांची मेहुणी हर्षता देखील बीएमसी वॉर्ड क्रमांक 226 मधून नगरसेवक आहे. (Joined BJP in 2019)

राहुल नार्वेकर यांनी 2019च्या महाराष्ट्र विधानसभेत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना दक्षिण मुंबईतील कुलाबा विधानसभेतून उमेदवारी दिली होती, जिथे ते विजयी झाले होते.

राहुल नार्वेकर शिवसेना आणि राष्ट्रवादीत होते

भाजपपूर्वी राहुल नार्वेकर हे शिवसेना आणि राष्ट्रवादीत होते. राहुल नार्वेकर हे अनेक वर्ष शिवसेनेत होते. 2014 मध्ये त्यांना राज्य विधान परिषदेची निवडणूक लढवायची होती पण शिवसेनेने नकार दिला. त्यानंतर त्यांनी शिवसेनेचा राजीनामा देऊन शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. (Rahul Narwekar was in Shiv Sena and NCP Before)

2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मावळ मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना विजय मिळवता आला नाही. त्यानंतर ते भाजपमध्ये दाखल झाले आणि कुलाब्यातून आमदार झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC T20I Ranking : कुलदीप यादवला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून मध्येच बाहेर करणे पडले महागात, आयसीसीने दिला दणका...

Thane News: पाणी टंचाईच्या झळा, पण बेकायदा वॉशिंग सेंटरमधून सर्रास पाण्याची उधळपट्टी, नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण

Ozar News : पोलीस बनले समुपदेशक! नाशिकमध्ये अपहरणाचा बनाव करणाऱ्या विद्यार्थ्यांचे पोलिसांनी केले समुपदेशन, पालकांना दिला योग्य सल्ला

Mangalwedha News : मंगळवेढ्यात नगराध्यक्षपदासाठी उच्च शिक्षित महिलांच्या दावेदारीची चर्चा

Nashik Crime : नाशिकमध्ये 'एमडी' तस्कराच्या मुसक्या आवळल्या; ६५ हजार रुपयांचे ड्रग्ज जप्त, मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल.

SCROLL FOR NEXT