Amruta Fadnavis sakal
महाराष्ट्र बातम्या

Amruta Fadnavis : कोण कुठे डोळा मारतंय...; अजित पवारांना उद्देशून अमृता फडणवीसांचं विधान

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस कायम या ना त्या कारणाना चर्चेत असतात. आजही त्यांनी अजित पवार यांना उद्देशून एक अनोखं विधान केलं आहे.

सकाळ माध्यम समूहाला दिलेल्या मुलाखतीत, आता २०२४ ला मुख्यमंत्रीपदावर तुम्ही क्लेम करणार का? असा प्रश्न अजित पवारांना विचारला असता, त्यावर अजित पवार म्हणाले की, क्लेम २०२४ ला का? आताच करणार, असं म्हणून अजित पवारांनी सूचक विधान केलं. त्यांच्या या विधानामुळे एकच हशा पिकला होता.

त्यांच्या या विधानानंतर आज राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहे. शिवाय अजित पवारांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चाही रंगल्या होत्या. अमृता फडणवीस यांना याबद्दल विचारण्यात आलं. त्यांनी बोलतांना 'कोण कुठे डोळे मारतंय ज्याचं त्यालाचं माहिती' असं विधान केलं आहे. त्यांनी हे विधान अजित पवारांना उद्देशून केल्याने आश्चर्य व्यक्त होतंय.

हेही वाचाः संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

मागच्या आठवड्यापासून अजित पवार भाजपच्या वाटेवर असल्याच्या बातम्या येत होत्या. शेवटी अजित पवारांनी माध्यमांसमोर येत असं काहीही नसल्याचं स्पष्ट केलं आहे. या सगळ्या अनुषंगाने अमृता फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्यावर त्यांनी कोण कुठे डोळा मारतंय, हे ज्याचं त्यालाच माहिती असं विधान केलं.

अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरे माध्यांनाशी बोलत होते. त्यावेळी अजित पवारांनी डोळा मारला होता. तो व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर अजित पवारांनी सारवासारव केली होती. अमृता फडणवीसांनी नेमका मुद्दा हेरत आज विधान केलंय.

काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

महाराष्ट्र असं राज्य आहे जे खूप काही करु शकतं आणि आता करतही आहे. प्रत्येक माणसाने सरकारबद्दल विचार करण्याची गरज आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याबद्दल त्या दोघांनाच जास्त माहिती आहे. राजकीय लोकांची एकमेकांशी जवळीक असते. खूप ठिकाणी हे लोक डोळे मारत असतात. त्याबद्दल त्यांनाच माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crude Oil Price Drop : पेट्रोल-डिझेल सह LPG स्वस्त होणार? अमेरिका- इराणमधील तणाव निवळताच कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण

जांभळाचे सडे म्हणजे दुष्काळाची चाहूल नव्हे! हे नैसर्गिक असल्याचा तज्ञांचा दावा, मग जांभूळ जास्त का येते?

Rajya Sabha Majority: ‘एनडीए’ दोन तृतीयांश बहुमताजवळ, राज्यसभेतील संख्याबळ वाढणार; इंडिया आघाडीचे बळ घटले, महाराष्ट्रातील २ पक्षात भूकंप?

Tandulwadi Accident : इरफान बनला 'देवदूत'! चिमुकल्याला बुडताना पाहून थेट विहिरीत मारली उडी अन् चौघांचा वाचवला जीव; डोळ्यांदेखत गाडी 200 फुटांवरूनच...

Karad Accident: सुटीचा आनंद ठरला दुर्दैवी! गणपतीपुळ्याच्या प्रवासात तरुण अभियंत्याचा मृत्यू, कार ३०० फूट खड्ड्यात, तीन मित्र अन् मध्यरात्री काय घडलं..

SCROLL FOR NEXT