vidhan parishad election 2022 maharashtra 
महाराष्ट्र बातम्या

योगींचा प्रचार ते दिपाली सय्यदवरील टीका, Bjp ने उमेदवारी दिलेल्या उमा खापरे कोण?

भाजपाने पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर करत उमा खापरे यांना संधी दिलीये

विश्वास पुरोहित

विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने बुधवारी उमेदवारांची यादी जाहीर केली असून यात श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांना संधी देण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडच्या विरोधी पक्षनेत्या राहिलेल्या उमा खापरे यांनी संधी देत संघटनेसाठी काम करणाऱ्या निष्ठावंताची दखल घेतली जाते, असा संदेश दिला आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपाकडून पंकजा मुंडे यांना संधी दिली जाते का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, भाजपाने पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर करत उमा खापरे (uma khapre) यांना संधी दिलीये. उमा खापरे यांना का संधी देण्यात आली, उमा खापरे कोण आहेत, हे जाणून घेऊया. (vidhan parishad election 2022 maharashtra)

कोण आहेत उमा खापरे?

उमा खापरे या पिंपरी चिंचवडच्या असून त्या महापालिकेत विरोधी पक्षनेत्या होत्या. आक्रमक पदाधिकारी म्हणून त्या ओळखल्या जात. पक्षवाढीसाठी त्यांनी झोकून दिले. त्यांच्या याच कामाची दखल घेत भाजपाने त्यांची महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड केली. उमा खापरे या मुंडे गटातील नेत्या म्हणून ओळखल्या जात.

योगींचा प्रचार ते दिपाली सय्यद यांच्यावरील टीका

पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अन्य राज्यांमध्ये प्रचारासाठी पाठवणे ही भाजपाची कार्यपद्धत आहे. मार्चमध्ये झालेल्या उत्तरप्रदेशमधील विधानसभा निवडणुकीसाठी उमा खापरे या उत्तरप्रदेशमध्ये गेल्या होत्या. उत्तरप्रदेशमधील महिला मतदारांशी संवाद साधण्यासाठी त्यांनी गोरखपूर आणि लगतचा परिसर पिंजून काढला.

निवडणुकीनंतर उमा खापरे या चर्चेत आल्या त्या दिपाली सय्यद यांच्यावरील टीकेमुळे. दिपाली सय्यद (deepali sayed) या भाजपाविरोधात आक्रमक झाल्या असून भाजपावर टीकेचे बाण सोडतात. या टीकेला उमा खापरे यांनी प्रत्युत्तर दिले होते. दिपाली सय्यद यांच्यावर कारवाई करा अन्यथा शिवसेना भवनावर मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला होता. (yogi adityanath bjp)

भाजपाने संधी देण्यामागची तीन कारणे?

पक्षनिष्ठा, ओबीसी समीकरण आणि महिला यामुळे भाजपाने उमा खापरे यांना संधी दिल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय या दोघांनीही पक्षसंघटनेसाठी काम केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Update: मोठी बातमी! मुंबईत उद्धव ठाकरेंच्या नगरसेवकांची संख्या वाढणार, सत्तासमीकरण बदलणार?

Chhatrapati Sambhajinagar: पुस्तकांचा खजिना झाला खुला; शंभरहून अधिक दालने, नामांकित प्रकाशकांचा सहभाग!

Sakal Book Festival: पुस्तकांच्या पालखीतून ‘वाचनसंस्कृतीचा जयघोष’; ‘सकाळ’ पुस्तक महोत्सवानिमित्त सरस्वती भुवन परिसरातून ग्रंथदिंडी!

BSF Success Story: शेतकरी आई-वडिलांच्या कष्टांचे चीज; मुलाची सीमा सुरक्षा दलात निवड, डोळ्यातून आनंदाश्रू, मित्रांनी उधळला गुलाल!

लहान सावित्री ठरतेय प्रेक्षकांची लाडकी, तक्षा शेट्टीच्या अभिनयाचं कौतुक

SCROLL FOR NEXT