Who Manas Pagar Accidental death of Youth Congress President  esakal
महाराष्ट्र बातम्या

कोण होते मानस पगार? नाशिक निकालाच्या आधी सत्यजित तांबेंच्या जवळच्या सहकाऱ्याचे निधन

कॉंग्रेसच्या युवा नेत्याचे अपघातात निधन झाले

सकाळ डिजिटल टीम

Nashik MLC Election Results 2023: एकिकडे नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी मतमोजणीस सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कॉंग्रेसच्या युवा नेत्याचे अपघातात निधन झाले आहे. त्याच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत.

आज नाशिक पदवीधर मतदारसंघाचा निकाल लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मानस पगार आणि त्यांच्यासोबत काही सहकारी नाशिक येथे जात असताना हा अपघात झाला. नाशिकमधील लोकमान्य रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र मानस यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. इतर लोकांवर उपचार सुरु आहेत.

मानस पगार कोण आहेत?

मानस पगार हे काँग्रेस पक्षाचे नाशिकचे युवक जिल्हाध्यक्ष होते. काँग्रेसमध्ये येण्याच्या आधीपासून पुरोगामी, धर्मनिरपेक्ष विचारांसाठी त्यांनी काम सुरु केले होते. युथ फॉर डेमोक्रसी या संघटनेच्या माध्यमातून सेक्यूलर विचारांना अधिक युवकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते आणि त्यांचे सहकारी कार्यरत होते.

तसेच काँग्रेस पक्षाची सोशल मीडियावरील बुलंद तोफ म्हणूनही त्यांची ओळख होती. भाजपाकडून करणाऱ्या येणाऱ्या आरोपांना, दाव्यांना पुराव्यासहीत खोडून टाकण्याचे प्रसंगी प्रतिवाद करण्याची भूमिका मानस घेत असत. त्यांच्या लिखाणामुळे अनेक तरुण काँग्रेससोबत जोडले गेले होते.

सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरल्यानंतर त्यांची बाजू सोशल मीडियावर जोरकस मांडण्याापसून ते प्रचारासाठी लिखाण करेपर्यंत अनेक जबाबदाऱ्या मानस पगार सांभाळत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2026

Aries Weekly Horoscope: मेष राशीसाठी मोठी खुशखबर! जुने वाद मिटणार, नवी दारे उघडणार; 'या' दिवसांत मिळेल भाग्याची साथ

SCROLL FOR NEXT