Rohit Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Monsoon Assembly Session : विरोधी पक्ष नेता कोणाला करावे? रोहित पवारांनी काँग्रेसला केली ही विनंती

Maharashtra Politics : विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसच्या दुसऱ्या फळतील नेत्यांना संधी

अंकिता खाणे (Ankita Khane)

Rashtravadi Congress News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत सत्तेत सहभागी झाले आहेत. अजित पवारांच्या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. या राजकीय घडामोडींनंतर आता विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे.

मात्र राष्ट्रवादीचे ९ आमदार सत्तेत सहभागी झाल्यामुळे विरोधकांची बाजू थोडी कमकूवत झाल्याचे पाहायला मिळत आहे.(Latest Marathi News)

आज पावसाळी अधिवेशन आहे मात्र विरोधकांकडून अद्यापही विरोधी पक्षनेता कोण असेल याबद्दल स्पष्टता नाहीये. यापूर्वी हे पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे होते, मात्र पक्षातील फूटीनंतर सभागृहातील सदस्यसंख्येनुसार काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगितलं आहे. यादरम्यान या पदासाठी काही संभाव्य नेत्यांची नावे समोर आली आहेत. तर आता काँग्रेसची बैठक सुरू आहे.(Latest Marathi News)

तर विरोधी पक्ष नेत्यावर बोलताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, काँग्रेसचे संख्याबळ जास्त आहे. काँग्रेसला मी विनंती करेन की वय कमी वय कमी म्हणून हिणवले जातं. त्यामुळे काँग्रेसने युवाला संधी द्यावी असं रोहित पवार यांनी म्हंटलं आहे.(Latest Marathi News)

विधानसभा विरोधी पक्ष नेतेपदासाठी विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर आणि सुनील केदार यांची नाव चर्चेत आहेत. या संबंधीत दिल्लीत पक्षाच्या हायकमांडने राज्यातील नेत्यांच्या चर्चा सुरू आहेत. यानंतर काँग्रेसमधील दुसऱ्या फळीतील नेत्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. या पदासाठी नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांची नाव चर्चेत होती. पण ही नावे मागे पडून दुसऱ्या फळीतील नेत्याला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता विरोधी पक्षनेते पदाची माळ कोणाच्या गळयात पडणार हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT