sharad pawar sakal
महाराष्ट्र बातम्या

विरोधीपक्ष नेता कोण असेल? शरद पवारांनी बोलावली बैठक

विधीमंडळात आजच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पाडली.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्य विधीमंडळामध्ये आज विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. यामध्ये भाजप-शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर हे विजयी झाले. तर महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांचा पराभव झाला. यानंतर आता विरोधीपक्ष नेतेपदी कोण असेल? याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्याचसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी आज बैठक बोलावली आहे. (Who will be Leader of the Opposition Sharad Pawar called a party meeting)

बैठकीबाबत माहिती देताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आज पक्षाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत दोन विषय चर्चेसाठी असणार आहेत. एकतर उद्या होणारा विश्वासदर्शक ठराव आणि विरोधीपक्ष नेतेपदी कोणाची निवड करायची? यावर चर्चा होईल"

राष्ट्रवादी काँग्रेसमधील 'या' नेत्यांची नावं चर्चेत

विरोधीपक्ष नेतेपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांच्यासह जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP नेत्यांचा मोठा विजय! आंदोलनाला वेग; अखेर अभिजीत दिपके यांच्यासह तिघांची सुटका, आता सर्वोच्च न्यायालयात काय घडणार?

Navratri 2026 Wishes in Marathi: 'उदे ग अंबे उदे'... नवरात्रीनिमित्त व्हॉट्सॲपवर शेअर करा देवी दुर्गेच्या आशीर्वादाचे हे सुंदर शुभेच्छा संदेश

Maharashtra Live News : सप्तशृंगी देवी यात्रेला सुरुवात,देवीच्या आभूषणांची पूजा

IND vs WI 3rd T20: इंदूरमध्येही आज बॅट विरुद्ध बॅट? दुसऱ्या सामन्यात ५०१ धावांचा पाऊस, आता तिसऱ्या टी-२०मध्येही फलंदाजांचे वर्चस्व राहणार?

Madhya Pradesh: अकराशे विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोफत चष्मे वाटप; टीबी रुग्णांना ८ किलोची पोषण आहाराची टोपली

SCROLL FOR NEXT