Uddhav Thackeray  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: शिवसेना नेमकी कुणाची? दिल्लीमध्ये ठाकरे गटाकडून हालचालींना वेग

दोन्ही गटाला कागदपत्र सादर करण्याचे निवडणूक आयोगाने आदेश

सकाळ डिजिटल टीम

राज्यातील राजकारणात अनेक खळबळ माजवणारी घटना काही दिवसांपूर्वी घडली. एकनाथ शिंदे आणि आमदारांनी शिवसेनेतून बंड करून भाजपसोबत सरकार स्थापन केलं. त्यानंतर नेमकी शिवसेना कोणाची याबाबत शर्यत निर्माण झाली होती. शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्याकडून खरी शिवसेना आमचीच असं सांगण्यात येत होतं. खरी शिवसेना कोणाची या प्रश्नाभोवती राज्यातील राजकारण ढवळून निघालं. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला यासंबधी कागदपत्र सादर केली जाणार आहे.

ठाकरे गटाला आणि शिंदे गटाला 23 नोव्हेंबरपर्यंत कागदपत्र सादर करण्याचे निवडणूक आयोगाने आदेश दिले आहे. दरम्यान आतापर्यंत ठाकरे गटाकडून 182 राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांचे पत्र, जवळपास 2 लाख 83 हजार पदाधिकाऱ्यांच्या प्रतिज्ञापत्र आणि 15 लाखांच्या आसपास प्राथमिक सदस्य नोंदणी निवडणूक आयोगाला सादर करणार आहे. आजच ठाकरे गट निवडणूक आयोगाला कागदपत्र सादर करणार आहे.

हे ही वाचा: गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

शिवसेना नेमकी कोणाची हा वाद सुरू असतानाच अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक जाहीर झाली, त्यामुळे निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं आणि दोन्ही गटांना वेगवेगळी नावं आणि चिन्हं दिली होती. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिलं आहे. ठाकरे गटाला मशाल आणि शिंदे गटाला ढाल-तलवार हे चिन्ह देण्यात आलं आहे.

खरी शिवसेना कोणाची हा वाद जिंकण दोन्ही गटासाठी महत्वाचं बनलं आहे. दोन्ही गट शर्थीचे प्रयत्न करत आहेत. दरम्यान ठाकरे गटाने याबाबत सर्व कागदपत्रे आणि इतर माहिती गोळा केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Silver Price Impact: चांदी ठरली गेमचेंजर! या उद्योगपतीची कोट्यवधींची कमाई; चांदीचे भाव वाढल्याने कंपनीचे शेअर्स रॉकेटसारखे झेपावले

रेखाने का केलेलं मुकेश अग्रवालशी लग्न? मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, 'तिच्या डोक्यात फक्त...

Ichalkaranji Election : महापालिका निवडणूक जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग; भाजप-मविआकडून इच्छुकांच्या मुलाखती सुरू

Latest Marathi News Live Update : महायुती करायची असेल तर राष्ट्रवादीला १५ टक्के जागा हव्यातच; अजित पवारांच्या नेत्याचा इशारा

RTO Action: ओला, उबेर, रॅपिडोवर आरटीओचा छापा; नियम भंगाची दंडात्मक कारवाई!

SCROLL FOR NEXT