Ajit Pawar  esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: शिवसेनेचे नाव अन् चिन्ह कोणाचे? अजित पवारांनी दिला 'त्या' सभेचा संदर्भ

पक्षाच्या धनुष्यबाण चिन्हावर निर्णायक निकाल येण्याची शक्यता

रुपेश नामदास

शिवसेना या नावासाठी ठाकरे गट आणि शिंदे गटातील वाद कोर्टात चालू आहे. तर पक्षाच्या चिन्हाचा वाद निवडणुक आयोगात चालू आहे. उद्या (सोमवार) पक्षाच्या धनुष्यबाण चिन्हावर निर्णायक निकाल येण्याची शक्यता आहे. या वादावर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या शिवाजी पार्कवरील एका भाषणाचा संदर्भ देत म्हणाले बाळासाहेब यांनी शिवाजी पार्कवरील एका सभेत सांगितलं होतं की तुम्ही मला जसं सांभाळून घेतलं तस माझ्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य यांना पण सांभाळून घ्या.

त्यांनी शिवसेनेची जबाबदारी उद्धव ठाकरे आणि युवा सेनेची जबाबदारी आदित्य ठाकरे यांना दिली होती. आणि आवाहन केले होते तुम्ही त्यांना साथ द्या, सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी उभे रहा" असे अजित पवार म्हणाले.

दरम्यान मागील आठवड्यात शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून निवडणुक आयोगात जोरदार युक्तीवाद केला होता. अजित पवार सांगली जिल्ह्यातील कासेगावात माध्यमांशी बोलत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditi Tatkare: मंत्री आदिती तटकरेंच्या PROचा मृत्यू, शतपावलीला गेले अन् अचानक कोसळले

IND vs AFG: भारतीय संघासाठी सर्वात मोठी सकारात्मक बातमी! ५ वर्षानंतर एका खेळाडूचे नाव पुन्हा चर्चेत; नेमकं काय घडतंय?

मराठमोळ्या अभिनेत्रीची हिंदी मालिकेत दमदार एंट्री; 'झी मराठी'च्या या सिरीयलचा आहे हिंदी रिमेक; फोटो पाहून ओळखू शकाल?

Marathi News Live Updates : खाजगी कोचिंग क्लास चालकांसाठी सरकारची नियमावली; क्लास चालकांचा तीव्र विरोध

Heramba Sankashti Chaturthi 2026: आज चंद्रोदय किती वाजता? इतर संकष्टीपेक्षा ही तिथी खास का? जाणून घ्या मुहूर्त आणि पूजा विधी

SCROLL FOR NEXT