jayant patil sharad pawar 
महाराष्ट्र बातम्या

Jayant Patil: शरद पवारांनी बरोबर सांगितलं होतं... जयंत पाटलांनी सांगितलं पराभवामागील आकड्यांचं गणित

Jayant Patil Legislative Council lost seat: महाविकास आघाडीमधील आठ मतं फुटल्यामुळे त्यांचा पराभव झाला आहे. याप्रकरणी जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पराभवामागील कारण सांगितलं आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- विधान परिषदेतील निवडणुकीत शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे. त्यांची पूर्ण मदार ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटावर होती. पण, महाविकास आघाडीमधील आठ मतं फुटल्यामुळे त्यांचा पराभव झाला आहे. याप्रकरणी जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पराभवामागील कारण सांगितलं आहे.

शरद पवारांनी माझ्यासाठी खूप वेळ दिला. त्यांनी सांगितलं होतं, कोण-कोणते लोक बसवू शकतात . शरद पवारांनी जे सांगितलं तसंच झालं. त्यांचा ७० वर्षांचे राज्यातील राजकारण आहे. त्यांनी मनापासून मला साथ दिली. दररोज फोनवर बोलायचे. रात्री उशिरा देखील त्यांनी मला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

..तर निवडून आलो असतो

मी राष्ट्रवादीच्या १२ मतांवर उभा होता. त्यातील एक मत फुटलं. यात आमचे देखील मतं फुटली. मला आणखी चार मतं मिळाली असती तरी दुसऱ्या प्राधान्यक्रमात २५ ते ३० मतं घेऊन निवडून आलो असतो. काँग्रेसने दुसरा प्राधान्यक्रम समान वाटला असता किंवा एक नंबर प्राधान्यक्रम त्यांनी ठाकरे गटाला दिला. मी १४ मतं घेऊनच निवडणूक लढवत होतो. पण, मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाला, असं ते म्हणाले.

पराभव झाला तरी पुन्हा लढू, महाराष्ट्राच्या राजकारणात अशाप्रकारचे राजकारण नव्हते. मी मागे ज्या निवडणुका लढवल्या तेव्हा अशा प्रकराची स्थिती नव्हती. जनतेने आणि मतदारांनी विचार करण्याची गरज आहे. मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाला आहे. आम्ही बेसावध राहिलो. आमची ताकद कमी पडली असेल, अशी कबुली पाटलांनी दिली.

मला देखील आत्मचिंतन करायचं आहे. जास्त अभ्यास झाला नसल्याने मी यावर जास्त बोलणार नाही. दोन तीन दिवसात मी यावर सविस्तर बोलेन. मतदारांवर खूप मोठा प्रभाव होता. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांना देखील काही करता आलं नाही, असं ते म्हणाले.

आम्ही नाराज होत नाही. अनवाणी पायाने फिरणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. आम्ही महाआआडी आणि शरद पवारांसोबत आहोत. काल रात्री आम्ही झोपलेलो नाही. काँग्रेसची सात मतं फुटली याचा मी अभ्यास केला नाही, असं ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalna : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, ७ महिलांचा जागीच मृत्यू; ४ गंभीर जखमी

NATO कागदी वाघ! रशियालाही माहितीय, आता अमेरिकेनं बाहेर पडलं पाहिजे; युद्धात एकटं पाडल्यानं ट्रम्प संतापले

Latest Marathi News Live Update : पैशांच्या वादातून मित्रानेच केला तरुणाचा खून

Property Tax : पिंपरी महापालिकेला ९४७ कोटींचे उत्पन्न; सव्वासहा लाख नागरिकांनी भरला मिळकतकर

Ambegaon Hailstorm Damage: आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागात गारपीटीचा कहर; कांदा, गहू, हरबरा व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT