Eknath Khadse Esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Khadse : शरद पवारांचं ऐकलं नाही म्हणून पाच वर्ष वाया गेली, असं का म्हणाले एकनाथ खडसे?

शरद पवारांचं ऐकलं नाही म्हणून पाच वर्ष वाया गेल्याची कबुली एकनाथ खडसेंनी एका कार्यक्रमात बोलताना दिली आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

भाजपला सोडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर उमेदवारी घेण्याबाबत शरद पवार आपल्याला सांगत होते. मात्र, आपण त्यावेळी त्यांचं ऐकलं नाही, ही आपली मोठी चूक झाली असल्याचं विधान राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी जळगावमध्ये बोलताना केलं आहे. शरद पवारांचं न ऐकल्यामुळे आपली पाच वर्ष वाया गेल्याचीही कबुली एकनाथ खडसेंनी यावेळी बोलताना दिली आहे.

पुढे बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर उमेदवारी घ्या असं शरद पवारांनी सांगितलं होतं. मात्र आपण शरद पवार यांचं त्यावेळी एकलं नाही असंही एकनाथ खडसे म्हणाले आहेत. त्याचं न ऐकल्याने ही आपली चूक झाली असल्याची कबुली एकनाथ खडसेंनी कार्यक्रमात दिली आहे.

'त्याचबरोबर भाजपमध्ये असताना 2019 मध्ये पक्षाने मला तिकीट दिले नाही. त्यामुळं माझी पाच वर्ष वाया गेल्याचंही खडसे म्हणाले आहेत. तर त्यावेळी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याबाबत शरद पवार मला सांगत होते. मात्र इतकी वर्ष भाजपचा विस्तार करण्यात घालवली होती. त्यामुळं पक्ष सोडून जाण्याचा विचार मनात येत नव्हता. मी संभ्रम अवस्थेत होतो', असंही खडसे म्हणाले आहेत. एकनाथ खडसे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

भाजप सोडून जाण्याचा विचार मनात येत नव्हता...

इतकी वर्ष भाजपचा विस्तार करण्यात घालवली होती. त्यामुळं पक्ष सोडून जाण्याचा विचार मनात येत नव्हता. मी संभ्रम अवस्थेत होतो', असंही खडसे म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT