Why did Eknath Shinde qualify 5 important points 
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde Won: एकनाथ शिंदे पात्र का ठरले? विधानसभा अध्यक्षांच्या निकालातील 5 महत्त्वाचे मुद्दे

Why did Eknath Shinde qualify 5 important points: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकालाचे वाचन केले आहे. शिवसेना ही शिंदेंचीच असल्याचा निकाल राहुल नार्वेकर यांनी दिला आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकालाचे वाचन केले आहे. शिवसेना ही शिंदेंचीच असल्याचा निकाल राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. तसेच शिंदे गटाचे १६ आमदार देखील पात्र ठरवण्यात आले आहेत. त्यामुळे शिंदे गटाचा विजय झाल्याचं स्पष्ट आहे. एकनाथ शिंदे आणि गटाला वैद्य ठरवताना विधानसभा अध्यक्षांनी ५ महत्त्वाचे मुद्दे मांडले. (Why did Eknath Shinde qualify 5 important points )

नार्वेकरांनी मांडलेले मुद्दे-

1. २१ जून २०२१च्या बैठकीचे हजेरी पत्रकाची मुळ प्रत व सादर केलेली प्रत यांमधील तफावत आहे. यामुळे हा पुरावा ग्राह्य धरता येणार नाही. बैठकीला अनुपस्थित राहणे हे अपात्रतेचे कारण ठरू शकत नाही. विधीमंडळ अधिवेशनास अनुपस्थिती हे कारण ठरू शकते, असं नार्वेकरांनी स्पष्ट केलं.

2. संपर्काच्या बाहेर गेले, केवळ याच कारणास्तव आमदारांना अपात्र ठरविता येणार नाही. शिवाय, ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर, रविंद्र फाटक यांनी सुरतेत एकनाथ शिंदे यांची भेट घेतली हे ही सिद्ध झाले. मिलिंद नार्वेकर आणि फाटक एकनाथ शिंदेंना सुरतमध्ये भेटले. त्यामुळे आमदारांशी संपर्क होऊ शकला नाही हे मान्य करता येणार नाही. भरत गोगावले यांनी सांगितले की सगळे आमदार उपस्थित होते. ३ आमदारांनी ही साक्ष दिली आहे की नार्वेकर आणि फाटक शिंदेंना भेटले आहेत.

3. सत्तांतराच्या काळात खरा पक्ष हा शिंदेंचा हे निवडणूक आयोगाने सांगितलं आहे. त्यांच्या निकालाचा मी आधार घेत आहे. त्यामुळे २१ जून २०२२ च्या शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीतील गैरहजरीच्या मुद्दयावर अपात्रता ठरविता येणार नाही, असं नार्वेकर म्हणाले.

4. बैठक घेतेवेळी सुनिल प्रभू हे प्रतोद नव्हते. त्यामुळे त्यांनी बजावलेला व्हीप ग्राह्य धरता येणार नाही. भरत गोगावले यांचा व्हीप मी ग्राह्य धरतोय. कारण भरत गोगावलेंची प्रतोदपदी निवड वैध आहे, असं ते म्हणाले.

5. विधिमंडळात बहुमत ज्याचे असेल त्याचाच पक्ष असतो. त्यामुळे शिंदे गट हीच खरी शिवसेना असून एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार पात्र आहेत. २१ जून २०२२ रोजी विधीमंडळ सचिवालयाकडे असलेल्या नोंदीनुसार शिंदे गटाकडे बहुमत दिसत आहे. त्यामुळे शिंदे गट हा त्या दिवशी खरा शिवसेना पक्ष असल्याचे दिसून येते. एकनाश शिंदेंना हटवण्याचा अधिकार पक्षप्रमुखांना नाही. पक्षप्रमुखाला पक्षातून कोणालाही काढता येत नाही. एकाचा निर्णय लोकशाहीसाठी धोक्याचं आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीने घेतलेले निर्णय ग्राह्य धरले जातील, असं नार्वेकर म्हणाले.

शिंदे गटाच्या बाजूने निर्णय देताना राहुल नार्वेकांनी वरील पाच महत्वाचे मुद्दे मांडले. त्यानंतर शिवसेना शिंदेंचीच असा निकाल दिला. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : बळकावलेल्या जमिनींपासून बंदूकीच्या गोळ्यांपर्यंत! पुणे पोलिसांनी निलेश घायवळभोवती आवळला फास, घरावर छापेमारी, हाती लागलं मोठं घबाड

योजनांना पात्र, तरीही कर्ज मिळेना; उपचाराअभावी मुलगा गमावला, चित्रकार मंत्रालयासमोर करणार 'अर्ध नग्न लक्षवेधी चित्र' आंदोलन

Latest Marathi News Live Update : पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज; उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता

Coldrif Syrup : मध्य प्रदेश-राजस्थानमध्ये मृत्यूंनंतर 'कोल्ड्रिफ सिरप'वर महाराष्ट्रात बंदी

Raju Shetti:'अन्यथा मुख्यमंत्र्यांना दिवाळी करू देणार नाही': माजी खासदार राजू शेट्टी; शेतकऱ्यांवर गंभीर संकट, मुख्यमंत्र्यांकडून दिशाभूल

SCROLL FOR NEXT